पुणे

सासवडमध्ये अनधिकृत हातगाड्यांचे अतिक्रमण

CD

सासवड, ता. ४ : सासवड (ता. पुरंदर) येथील पुणे- पंढरपूर रस्त्यावरील राजमाता जिजामाता उद्यानासमोर अनधिकृत खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक फळे- भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानांसमोरच ही नवीन अतिक्रमणे झाल्याने त्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. याबाबत जिजामाता फळे- भाजी विक्रेते संघटनेने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.​
हातगाड्या थेट महामार्गावर असल्याने आणि त्यापुढे ग्राहकांची वाहने अस्ताव्यस्त उभी राहत असल्याने रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे अनेकदा छोटे अपघात आणि वाहतूक कोंडी होते. शाळा- महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहेत. बाहेरील विक्रेत्यांनी दुकानांसमोरच जागा अडवल्याने फळे व भाजीपाल्याची मालवाहू वाहने उभी करायलाही जागा उरत नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक हरून बागवान यांनी सांगितले आहे.
​यापूर्वी एसटी स्थानकासमोर असलेले हे स्टॉल वाहतूक समस्येच्या तक्रारीमुळे आता जिजामाता उद्यानासमोर स्थलांतरित झाले असून, येथेही हीच समस्या निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेवेळी हटवलेली ही अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. जिजामाता फळे व भाजीपाला विक्रेते संघटनेने ही मागणी लावून धरली आहे.
याबाबत मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी, संबंधितांना नोटीस देऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

06505, 06506

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT