पुणे

सासवड शहराचा पाणीपुरवठा राहणार सुरळीत

CD

परिंचे, ता. १० : सासवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर धरण पाणीपुरवठा योजनेवर वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा आणि त्यामुळे विस्कळीत होणारे जलनियोजनाचे चक्र आता थांबणार आहे. या समस्येवर कायमस्वरूपी पर्याय म्हणून शनिवारी (ता. ९) ७५० केव्ही क्षमतेचा जनरेटर बसविण्यात आला. यामुळे शहराचा पाणीपुरवठा आता सुरळीत राहणार आहे.

​वीर धरण योजनेची जॅकवेल सातारा जिल्ह्यात येते तर पाणी पुरंदर तालुक्यातील कांबळवाडी पंप हाऊसपर्यंत आणले जाते. तेथून पुन्हा उपसा करून पाणी पांगारे घाटमाथ्यावरील टाकीत साठवले जाते आणि तिथून सायफन पद्धतीने सासवडपर्यंत पोहोचते. या दरम्यान, सातारा आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांतील वीज कपातीच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने भारनियमनात अडचण निर्माण होते. त्यात गराडे आणि घोरवडी पाझर तलावातील पाणी बंद झाल्याने शहराची दररोजची एक कोटी लिटर पाण्याची गरज पूर्णपणे वीर योजनेवर अवलंबून आहे.
याबाबत पाणीपुरवठा सभापती ज्ञानेश्वर गिरमे यांनी सांगितले की, या योजनेवर २४० अश्वशक्तीचे तीन पंप कार्यरत आहेत. त्यापैकी एका अतिरिक्त पंपाला हा ७५० केव्हीचा जनरेटर जोडण्यात आला आहे. आता महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाला तरीही जनरेटरच्या साहाय्याने उपसा सुरू राहील.

याप्रसंगी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, गटनेते अजित जगताप, नगरसेवक राजन जगताप, प्रदीप राऊत, मयूर चौखंडे, नगरसेविका प्रियांका साकेत जगताप, स्मिता सुहास जगताप, लिना सौरभ वढणे व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT