पुणे

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!

CD

सातारा जिल्हा बँकेच्या
निवडणुकीचा बिगुल वाजला!

एक नोव्हेंबरला मतदान; २१ जागांसाठी रंगणार सामना

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण अर्थकारणाचा कणा आणि शेतकऱ्यांची खरी ‘आर्थिक नाडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (२०२६-२०३१) पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सहकार चळवळीशी आणि शेतकऱ्यांशी थेट नाळ जोडलेल्या या संस्थेच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार, उमेदवारांना २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता निवडणूक कार्यालयात पार पडेल. त्यानंतर ६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अशी मुदत देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करून लढतीचे चित्र स्पष्ट करणारी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. एक नोव्हेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान पार पडेल, तर तीन नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.
बँकेच्या एकूण २१ जागांसाठी होणाऱ्या या चुरशीच्या निवडणुकीत विविध गटांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे ११ प्रतिनिधी, महिला प्रतिनिधींसाठी २ जागा, तसेच अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी प्रत्येकी १ जागा आणि प्रक्रिया व इतर पतसंस्थांमधून उर्वरित जागा अशा एकूण २१ जागांसाठी ही मोठी लढत होणार आहे. शेती आणि ग्रामीण अर्थकारणाला थेट दिशा देणारी ही बँक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बँकेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या धोरणांचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर होत असतो. त्यामुळे या बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आतापासूनच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : ठेकेदार कंपनीचा १८ कोटींचा दंड थकीत विनापरवानगी नदीत खोदाई; एकाचा बळी गेल्यानंतर कारवाईला वेग

Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’वर पुन्हा एकदा विषारी फेसाची चादर ; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अळीवाचे लाडू कधी खाल्लेत का? पाहा ही झटपट रेसिपी; Aliv Ladoo Recipe

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Bijwadi Rain Shortage : उत्तर माणमधील बिजवडी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; खरीपानंतर रब्बी हंगामही धोक्यात

SCROLL FOR NEXT