ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा प्रत्येकी दहा लाखांचा अपघात विमा
कोरेगाव, ता. १५ : सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेने आपल्या सर्व ७२३ सभासदांचा प्रत्येकी दहा लाख रुपयांचा अपघात विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत अधिकारी सभासद व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.
ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक हे गावपातळीवर अहोरात्र काम करत असतात. शासकीय कामकाज, दौरे, बैठका, तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना सतत गावोगावी प्रवास करावा लागतो. अशा वेळी अपघाताचा धोका संभवतो. ही बाब लक्षात घेऊन पतसंस्थेच्या संचालक मंडळाने नुकताच सर्व सभासदांचा अपघात विमा काढण्याचा निर्णय घेतला असून, याचा सर्व खर्च पतसंस्थेने उचललेला आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनी दिली. या विम्याअंतर्गत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व तसेच अपघातामुळे होणाऱ्या वैद्यकीय उपचार खर्चासाठी सभासद व त्यांच्या वारसांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे. यामुळे सभासदांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहणार आहे. या निर्णयाचे सर्व सभासदांनी स्वागत केले असून, जिल्ह्यातील अधिकारी वर्गातून पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे कौतुक होत आहे.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे विभागीय सहसचिव रजनीकांत गायकवाड, जिल्हाध्यक्ष संतोष माळवे, सरचिटणीस संदीप सावंत, ज्येष्ठ नेते बबन धायगुडे, ज्ञानेश्वर गायकवाड, गणेश दडस, शिवाजी जाधव, मोहन कोळी, कृष्णात महाडिक, पतसंस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब गावडे, संचालक दिलीप जुनघरे, प्रशांत फडतरे, अशोक मिंड, सुरेश देसाई, संजय बाचल, धर्मेंद्र शिंदे, मंगेश शिंदे, गणेश पवार, रमेश माळी, संतोष नाळे, भीमराव टिळेकर, जयेश खंदारे, तृप्ती जाधव, सारिका पवार, हिम्मत गायकवाड, सर्व तालुकाध्यक्ष, सचिव व कर्मचारी उपस्थित होते.
कोट...
अपघात विमा हा केवळ विमा नसून, सभासदांप्रति असलेली आमची जबाबदारी आहे. यापुढेही सभासदांच्या हितासाठी असे अनेक उपक्रम राबविण्यात येतील.
अभिजित चव्हाण,
अध्यक्ष, सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.