पुणे

आरोग्य सेवा सलाईनवर

CD

‘आरोग्‍य’ची तब्‍बल २८४ पदे रिक्‍त
जिल्ह्यातील सेवा सलाईनवर; चार-चार मंत्री, पण लक्ष कधी देणार?

प्रवीण जाधव : सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. १० : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर कोट्यवधींच्या खर्चाच्‍या गप्पा सुरू असताना प्रत्यक्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध कर्मचाऱ्यांची तब्बल २८४ पदे रिक्त आहेत. त्यातच आरोग्य यंत्रणेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्‍या निलंबनामुळे हा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांना सांभाळावा लागत आहे. परिणामी, उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकंदर आरोग्य व्यवस्था सलाईनवर आली असताना जिल्ह्यातील चार- चार मंत्री करताहेत तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.

जिल्हा रुग्णालयात दररोज सुमारे एक हजार २०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. दररोज सुमारे ३५० रुग्ण उपचारासाठी आंतररुग्ण विभागात दाखल असतात. केवळ २५० खाटांच्या रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच दररोज किमान १० ते १५ शस्त्रक्रिया होत असतात. आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य व्यवस्था ताणाच्या टोकावर पोहोचली आहे.

जबाबदारीची पदे तात्पुरत्या स्वरूपात
जिल्हा रुग्णालयातून संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कारभार पाहिला जातो. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालय आणि त्याअंतर्गत ग्रामीण रुग्णालयांमध्ये मिळून १०५८ मंजूर पदांपैकी तब्बल २८४ पदे रिक्त आहेत. काही विभागांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी कर्मचारी उपलब्ध आहेत. वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यात गंभीर स्थिती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त शल्यचिकित्सकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यामुळे या पदांचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्‍याने निर्णय प्रक्रिया आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

कामाचा अतिरिक्त ताण
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सलग अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत. ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना साताऱ्यात धाव घ्यावी लागत आहे. काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने सेवा केवळ नावापुरती सुरू असल्याची स्थिती आहे. या अतिरिक्त ताणामुळे रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांवर परिणाम होतो आहे.

चार मंत्री करतायत काय?
विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील चार लोकप्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करत असतानाही आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वाढत्या रुग्णभाराच्या तुलनेत मनुष्यबळ भरती, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती आणि प्रशासकीय स्थैर्य याकडे गंभीर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रुग्णसेवा सांभाळणाऱ्या डॉक्टरांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. ‘आहे त्या मनुष्यबळावर किती ताण घ्यायचा?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच दोन्ही मुख्य पदेही रिक्त असल्याने वाढता कामाचा ताण, रिक्त पदे आणि अपुरी यंत्रणा यामुळे भविष्यात आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
.......................
जिल्हा रुग्णालय सातारा व ग्रामीण रुग्णालयांतील रिक्त पदांची स्थिती
अ.क्र. पद / संवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
१) जिल्हा रुग्णालय सातारा – वर्ग १ गट-अ २० ४ १६
२) ग्रामीण रुग्णालये वैद्यकीय अधिकारी २७ ७ २०
३) जिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी – वर्ग २ ३१ १० २१
४) दंत शल्यचिकित्सक वैद्यकीय अधिकारी १९ ४ १५
५) उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये वैद्यकीय अधिकारी ६८ २४ ४४
६) जिल्हा रुग्णालय सातारा – वर्ग ३ गट-क ८० ६२ १८
७) उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये – वर्ग ३ १६४ ११९ ४५
८) जिल्हा रुग्णालय सातारा – चतुर्थ वर्ग १४० १०८ ३२
९) उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये – चतुर्थ वर्ग १५३ १२६ २७

एकूण १०५८ ७७४ २८४
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT