सातारा - बाजारपेठेतील नवीन सॅककडे कुतूहलाने पाहताना विद्यार्थी.
सातारा - बाजारपेठेतील नवीन सॅककडे कुतूहलाने पाहताना विद्यार्थी. 
पुणे

कार्टूनमय झाली दप्तरे

सकाळवृत्तसेवा

सातारा - ‘छोटा भीम’, ‘डोरेमॉन’, ‘मिकीमाउस’, ‘टॉम अँड जेरी’, ‘बार्बी’, ‘बेनटेन’ या कार्टूनची आकर्षक दप्तरे बाजारात दाखल झाली आहेत. ही दप्तरे वजनाला हलकी आणि मजबूत अशी आहेत. मे महिना संपत आल्याने पालकांना शालेय साहित्य खरेदीचे वेध लागले आहेत. कार्टूनचा प्रभाव इतका आहे, की बाजारात दप्तरे सुद्धा कार्टूनमय बनवली आहेत. त्याला मागणीही चांगली आहे. 

शाळा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी राहिल्याने पालकांची मुलांच्या शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठेत साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. सध्या २०० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारची दप्तरे उपलब्ध आहेत. अनेक कंपन्यांनी दप्तरांचे विविध प्रकार बाजारांत आणले आहेत. आडव्या दप्तरांची ‘क्रेझ’ कमी झाली असून, दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारच्या ‘सॅक’च्या डिझाईन्सला महत्त्व प्राप्त होत आहे. खाऊचा डबा, कंपास पेटी ठेवण्यासाठी कप्पे, वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक डिझाईन याबरोबर आतील वह्या, पुस्तके ठेवण्याचे कप्पे याची पाहणी करूनच दप्तरांची खरेदी केली जात आहे. पावसाळ्यात दप्तर भिजू नये, म्हणून रेन कव्हरचीही खरेदी केली जात आहे. मुलांची आवड दर वर्षी बदलत असल्याने वेगवेगळ्या प्रकारची दप्तरे सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. दप्तर आणि सॅकमध्ये अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. कार्टूनची चित्रे असलेल्या दप्तरांना अधिक मागणी आहे. सॅकमध्ये जिन्स, कॉटन जिन्स, कापडी, वॉटरप्रूफला मोठी मागणी आहे. ब्रॅंडेड कंपनीच्या सॅकदेखील आहेत. खास चिमुकल्यांसाठी तयार केलेल्या कार्टून शेप सॅक बाजारात पेठेत ग्राहकांना आकर्षित करत आहेत. 

‘टेडी सॅक’ यंदाचे वैशिष्ट्य 
लहान मुलांसाठी टॉईजचा वापर करून विशिष्ट कार्टूनच्या आकाराची तयार केलेली छोटीशी ‘टेडी सॅक’ यंदाचे वैशिष्ट्य आहे. ही सॅक वजनाला हलकी आणि मजबूत असल्यामुळे दप्तराचे ओझे होणार नाही, अशी आहे. त्यामुळे या सॅकला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: MPही सूरतची पुनरावृत्ती? शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश..काँग्रेसची कोंडी

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT