पुणे

प्रत्‍येक प्रभागात बसणार सुशोभित पथदिवे

CD

साताऱ्याच्या सौंदर्यात ‘प्रकाशाची’ नवी भर

प्रत्येक प्रभागात १० आकर्षक पथदिवे; पहिल्या टप्प्यात ५०० दिवे बसविण्याचा पालिकेचा निर्णय

सातारा, ता. ९ : सातारा शहरासह विस्‍तारीत भागातील प्रभागांच्‍या सुशोभीकरणावर सातारा पालिकेने भर दिला आहे. यासाठी विविध उपाययोजना राबवत असतानाच रस्‍त्‍यांसह परिसरांचे सौदर्य वाढविण्‍यासाठी सुशोभित व आकर्षक पथदिवे प्रत्‍येक प्रभागात बसविण्‍याचा निर्णय पालिकेने नुकताच घेतला आहे. यानुसार पहिल्‍या टप्‍प्‍यात असे आकर्षक ५०० पथदिवे नगरसेवकांच्‍या सूचनेनुसार आगामी काळात बसवण्‍यास सुरुवात होणार आहे.

मराठा साम्राज्‍याची राजधानी असणाऱ्या सातारा शहराचे ऐतिहासिक महत्त्‍व संपूर्ण देशभर आहे. या महत्त्‍वाला अधोरेखित करण्‍यासाठी सातारा पालिकेने शहरातील ऐतिहासिक वास्तू व स्‍थळांचे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण, संवर्धन व जतन करण्‍याचा निर्णय घेत त्‍यासाठीची प्रत्‍यक्ष कार्यवाही गत काही वर्षांपासून सुरू केली आहे. यानुसार शहरातील विविध हौद, तळे, अजिंक्‍यतारा किल्‍ला, चारभिंती परिसराचे सौंदर्य पालिकेने राबवलेल्‍या उपाययोजनांमुळे वाढले आहे.
हे करत असतानाच राजपथासह इतर भागात नव्‍याने झालेल्‍या रस्‍त्‍यांचे सौदर्य वाढण्‍यासाठी दुतर्फा आकर्षक, वेगळ्या धाटणीचे, बांधणीचे पथदिवे बसविण्‍यात आले आहेत. या पथदिव्‍यांमुळे या रस्‍त्‍यांचे सौंदर्य रात्रीच्‍या वेळेस जास्‍तीचे खुलून निघते. याच रस्त्यांच्या धर्तीवर सातारा पालिकेने शहरातील २५ प्रभागांत असे आकर्षक पथदिवे बसवण्‍याचा निर्णय नुकताच घेतला. यानुसार काही रस्‍ते, स्‍थळे, चौकांची निवड आगामी काळात नगरसेवकांच्‍या मार्फतीने पालिका प्रशासन करणार आहे.
प्रत्‍येक नगरसेवकाच्‍या सूचनेनुसार त्‍यांच्‍या प्रभागात दहा पथदिवे बसवण्‍यात येणार असून, यामुळे त्‍या भागाचे सौंदर्य वाढीस मदत होणार आहे. यासाठीची सर्व तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली असून, तांत्रिक प्रक्रिया पार पडल्‍यानंतर हे पथदिवे बसवण्‍यासाठीची प्रत्‍यक्ष कार्यवाही आगामी काळात सुरू करण्‍यात येणार असल्‍याची माहिती पालिकेच्‍या विद्युत विभागाकडून देण्‍यात आली.
.............
सात कोटींचा खर्च
या कामासाठी पालिकेच्‍या वतीने सात कोटी १५ लाख रुपयांचा खर्च करण्‍यात येणार आहे. यासाठीचा निधी जिल्‍हा वार्षिक योजनेतून किंवा शासनाकडून मिळणाऱ्या इतर योजनेच्‍या निधीतून करण्‍याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडून जिल्‍हा प्रशासनाकडे आवश्‍यक तो पाठपुरावा सुरू करण्‍यात आला आहे.
.............
डेकोरेटिव्‍ह पथदिव्‍यांचे कॅरीकेचर वापरणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर दगड, चिखल आणि चपला फेकल्या, 'चोर-चोर'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT