पुणे

पालिकेचा अतिक्रमण मुक्‍तीचा आराखडा

CD

सातारा पालिकेचा अतिक्रमणमुक्तीसाठी आराखडा

शिवराज तिकाटणे- मोळाचा ओढा मार्गासाठी मोहीम; वाहतूक कोंडी, अपघातांना बसणार आळा

सातारा, ता. २३ : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शिवराज तिकाटणे ते मोळाचा ओढा या मुख्य मार्गाला अतिक्रमणांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी येथील पालिकेने व्यापक आराखडा तयार केला आहे. या मोहिमेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेत संयुक्त कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. यशस्वी अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेला दिलासा मिळणार आहे.

कऱ्हाड, पुणे, मेढा तसेच जिल्ह्यातील विविध भागांना जोडणाऱ्या या मार्गावर दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या टपऱ्या, हातगाड्या, पथाऱ्या आणि व्यावसायिकांकडून झालेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्याची उपयुक्त रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे गोडोली चौक, पोवई नाका, मध्यवर्ती बसस्थानक, भूविकास बँक चौक, करंजे नाका आणि मोळाचा ओढा परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून, किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने नुकतीच या संपूर्ण मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात अतिक्रमणग्रस्त ठिकाणांची नोंद करून टप्प्याटप्प्याने कारवाईचा आराखडा तयार केला आहे. संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने संयुक्त पद्धतीने मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे, शिवराज तिकाटणे ते गोडोली नाका या भागात नुकतेच रस्तारुंदीकरण झाले असले तरी पुढील अनेक भाग अद्याप अरुंद आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मूळ क्षमतेचा वापर होत नसल्याचे समोर आले आहे. अतिक्रमणे हटविल्यानंतर उपलब्ध रस्त्याची संपूर्ण रुंदी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याने शहरातील प्रमुख वाहतूक मार्ग अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

................
चौकट
...........

हॉकर्स धोरणालाही गती?

पालिकेच्या प्रस्तावित आराखड्यात केवळ अतिक्रमण हटविण्यावर भर नसून, पर्यायी व्यवस्था उभारण्याचाही विचार सुरू आहे. रस्ते आणि पदपथ मोकळे ठेवत हातगाडीधारक व हॉकर्स यांच्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचा पर्यायही चर्चेत आहे. त्यामुळे उदरनिर्वाह आणि वाहतूक व्यवस्थापन यात समतोल साधण्याचा प्रयत्न होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

................

करंजे नाका ठरतोय ‘बॉटलनेक’

महालक्ष्मी मंदिर ते करंजे नाका या भागातील रस्तारुंदीकरणाचे काही काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे या ठिकाणी निर्माण होणारी वाहतूक कोंडी शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेबरोबरच रस्ता रुंदीकरणातील त्रुटी दूर केल्यास या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

.........

मार्गावरील प्रमुख ‘हॉटस्पॉट’

गोडोली नाका
गोडोली चौक
पोवई नाका
तहसीलदार कार्यालय परिसर
मध्यवर्ती बसस्थानक परिसर
भूविकास बँक चौक
करंजे नाका
मोळाचा ओढा

अतिक्रमण हटाव मोहिमेत हे अपेक्षित

मुख्य रस्ता टपऱ्या व हातगाड्यांमुक्त करणे.
पदपथांवरील पथाऱ्या आणि अडथळे हटविणे.
वाहतुकीसाठी संपूर्ण रुंदी उपलब्ध करणे.
हॉकर्ससाठी पर्यायी जागा निश्चित करणे.
अपघात व वाहतूक कोंडी कमी करणे.

...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

IPL 2027 Trade: आयपीएल इतिहासातील High-Profile डिल! रिषभ पंत १२ कोटींचा तोटा सहन करून 'या' संघाच्या ताफ्यात, कुलदीप यादव LSG कडे

SCROLL FOR NEXT