मंगलदास रस्ता - सतीश मगर यांनी ‘क्रेडाई’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे स्वागत करताना जक्षय शहा. (डावीकडून) पंकज गोयल, मगर, शहा आणि हर्षवर्धन पतोडिया.
मंगलदास रस्ता - सतीश मगर यांनी ‘क्रेडाई’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे स्वागत करताना जक्षय शहा. (डावीकडून) पंकज गोयल, मगर, शहा आणि हर्षवर्धन पतोडिया. 
पुणे

‘क्रेडाई’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मगर

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांची ‘क्रेडाई’च्या (काँन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी जक्षय शहा यांच्याकडून रविवारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ही निवड पुढील दोन वर्षांसाठी आहे.

देशातील खासगी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘क्रेडाई’च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मगर म्हणाले, ‘‘कौशल्य आणि वृक्षारोपण यावर पुढील दोन वर्षांमध्ये भर देण्यात येणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आधुनिक कौशल्य आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे. पहिल्या टप्प्यात एक लाख लोकांना व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षकांकडून इतरांना कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच पुढील दोन वर्षांमध्ये देशभरात पाच लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. टाऊनशिप आणि त्याच्या परिसरात ही झाडे लावण्यात येतील. देशातील स्वच्छ शहरे करण्याच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणार आहे.’’ 

मगर म्हणाले, ‘‘देशातील २१२ शहरांमध्ये ‘क्रेडाई’च्या शाखा आहेत. त्या इतर शहरांमध्येही विस्तारित करण्यात येतील.  या दरम्यान ‘पॉलिसी ॲडव्होकसी’वर भर देण्यात येईल. परवडणारी घरे बांधायची म्हटले तर सिमेंटच्या किमती कमी होत नाहीत. त्यामुळे घरांच्या किमती कशा कमी होतील? जागेच्या किमतीला ‘प्रीमियम’ भरावा लागतो. त्याचा किती फटका बसतो, याचा विचार झाला पाहिजे. या सर्वांचा नवीन सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.’’

शहा म्हणाले, ‘‘गेली दोन वर्षे फक्त ‘क्रेडाई’साठीच नाही, तर देशातील बांधकाम व्यावसायिकांसाठी उलथापालथीची होती. या दरम्यान क्रेडाईने कामातून बांधकाम क्षेत्र आणि त्यातील भागधारकांसाठी आशादायी वातावरण तयार केले आहे. सतीश मगर यांचा अनुभव आणि या क्षेत्रातील समग्र दृष्टी याचा फायदा ‘क्रेडाई’ला होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था नव्या उंचीवर पोचेल.’’ या वेळी ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय सचिव पंकज गोयल आणि हर्ष वर्धन पतोडिया उपस्थित होते.

देशातील ‘वस्तू व सेवाकर’ (जीएसटी) कमी झाला आहे. त्यातील संदिग्धता दूर होण्याची वाट ग्राहक बघत होता. सरकारने ही संदिग्धता दूर केली आहे. त्यामुळे जीएसटीचे चित्र आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता बांधकाम व्यवसाय पूर्वपदावर येण्यास हरकत नाही, 
- सतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

SCROLL FOR NEXT