pargao
pargao 
पुणे

पारगाव तर्फे आळे येथील उसाची प्राधान्य क्रमाने तोडणी करणार : सत्यशील शेरकर

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर येथील इनामतीमळा परिसरातील मंगळवारी (ता. 9) दुपारी अकरा शेतकऱ्यांचा तोडणीस आलेला सतरा एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. कारखाना सुरू होताच या उसाची प्राधान्याने तोडणी करून गाळप केला जाईल असे श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले, सध्या ऊस हे एकमेव हमीभाव देणारे पीक असल्याने अशा आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. गेल्या गाळप हंगामात विघ्नहरच्या कार्यक्षेत्रात सुमारे 450 एकर क्षेत्रातील उस पीक जळल्याने नुकसान झाले. यात शॉर्टसर्किट होऊन ऊस जळीताचे प्रमाण 75 टक्के आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी हात पोहचेल इतक्या अंतरावर विद्युत वाहक तारा खाली आल्या आहेत. याबाबतीत विद्युत मंडळाने तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. शॉर्टसर्किट होऊन ऊस जळीत झाल्यानंतर विद्युत मंडळाकडे भरपाई मिळणेसाठी अर्ज केला जातो. कारखान्यामार्फत देखील पाठपुरावा करण्यात येतो. मात्र अद्याप कोणासही भरपाई मिळालेली नाही याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे.

पारगाव तर्फे आळे परिसरात मंगळवारी दुपारी वीज वितरण कंपनीच्या वतीने भारनियमन करण्यात आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास भारनियमन बंद होऊन वीज पुरवठा सुरु झाला असता अचानक विजेचा दाब वाढल्याने विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन व खांबावरील वीजवाहक तार तुटली. यावेळी ठिणग्या उडून आगीचे लोळ उभ्या ऊस पिकावर पडल्याने उसाने पेट घेतला. परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने आग वेगाने भडकली. 

या घटनेची माहिती मिळताच शेरकर, प्रमुख शेतकी अधिकारी गोरख उकिरडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरातील शेतकरी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. ऊसाच्या पिकात जेसीबी मशीनच्या सहाय्याने ठिकठिकाणी जाळपट्टे काढण्यात आल्याने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. ऊसाबरोबर पिकातील ठिबक सिंचन संचही जळाल्यानेही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

येथील रामचंद्र कोडींबा साबळे, गणपत पाराजी डुकरे, अर्जुन म्हतारबा चव्हाण, प्रभाकर किसन रसाळ, पोपट किसन रसाळ, सुदाम किसन रसाळ, गणपत रोहिदास रसाळ, गोरक्ष गणपत तट्टू, मच्छीद्र गणपत तट्टू, लक्ष्मण विठोबा डुकरे, कमल बन्सी डुकरे या अकरा शेतकऱ्यांचे तोडणीस आलेल्या तेरा एकर आडसाली व दोन एकर खोडवा अशा एकूण 17 एकर ऊस पिकाचे विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT