कृष्णा नदीचे पात्र खड्ड्यांच्या विळख्यात
भुईंज परिसरातील स्थिती; वाळू उपशाचा परिणाम, शासनाचा नियमभंग
भुईंज, ता. २४ : सातारा जिल्ह्यासह वाई तालुक्याला सधन करणारी कृष्णा नदी महाभारत पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. मात्र, शासनाचे नियम डावलून बेसुमार वाळू उपशामुळे नदीचे पात्र खड्ड्यांच्या विळख्यात आहे. असले, भुईंज, चिंधवली हद्दीत ही स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, वाळू उपशामुळे पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे भविष्यात नदीपात्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी वाचवा म्हणणाऱ्या शासनाच्या निधीचा वापर करून नदीपात्राला बकाल स्वरूप दिले जात आहे.
असले ते चिंधवली दोन ते तीन किलोमीटर अंतराचे नदीचे पात्र भुईंज परिसरातून गेले आहे. मात्र, त्या नदीपात्रात तीन ठिकाणी वाळू उपशासाठी परवानगी देण्यात आली आहे. ठेकेदाराने त्याठिकाणी यांत्रिकीकरणाचा वापर करून पोकलेनच्या साहाय्याने मोठमोठे खड्डे पाडून वाळू उपसा केला आहे. शासनाने आखून दिलेल्या व परवानगी नसलेल्या खोलीपेक्षाही अधिक खोल खड्डे पाडले आहेत.
पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहते. कधीकधी धोक्याची पातळी देखील गाठते. प्रशासन दर वर्षी रेडअलर्टचे आदेश देखील देते. कृष्णा नदीपात्रामुळे वाईपासून कोरेगाव पंचक्रोशीतील विहिरी व इंधनविहिरी आजही आहेत. नदीपात्रातील वाळू उपशाला परवानगीने, तसेच तस्करी करून चोरणाऱ्यांनी नदीपात्रात केलेले जीवघेणे खड्डे समस्येचे कारण बनले आहे.
कृष्णा नदी फक्त धार्मिक नव्हे, तर इतिहासाचीही साक्षीदार आहे. मात्र, शासन कोट्यवधींचा निधी खर्च करून नदीपात्राला खड्ड्यांच्या विळख्यात नेताना दिसत असून, त्यामुळे भविष्यात मोठा धोका संभवतो.
-----------------------
धार्मिक स्थळांना धोका
भुईंजजवळ नदीच्या पात्रात वाळू उपसा सुरू असताना नागरिकांनी तेथील धार्मिक स्थळांना भविष्यात धोका होऊ शकतो, वाळू उपसा त्वरित थांबवावा, असा पत्र व्यवहार तहसीलदार कार्यालयाशी केला होता. मात्र, कार्यालयाच्या दिरंगाईमुळे वाळू उपसा जोमाने झाला. त्यावर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय याठिकाणी दाद मागितली होती. त्यावर मंत्री मकरंद पाटील यांनी संबंधित ठिकाणचा वाळू उपसा बंद करावा व त्याचा अहवाल पाठवावा, असे उत्तर देण्यात आले आहे.
-----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.