सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २ : ‘‘विकासाच्या नावाखाली जंगलतोड करून हजारो झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. जंगल केवळ माणसांचे नसते, तर ते पशुपक्ष्यांसह असंख्य जीवांचे घरही असते. मात्र महाराष्ट्राला झाडे खाणाऱ्या विषाणूची लागण झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून साधलेला विकास हा फसवा आणि खोटारडा आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील जनतेने एकजूट व्हावे,’’ असे आवाहन अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी नागपुरात केले.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत प्रस्तावित पंप्ड स्टोरेज वीज प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडली जात आहेत. या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींचा विरोध होत असून, ‘सह्याद्री वाचवा, महाराष्ट्र वाचवा’ या अभियानांतर्गत आज नागपुरात ‘थाळी वाजवा’ आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सयाजी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्र सरकारने जनतेची फसवणूक केली असून राज्य विकायला काढले आहे. अगदी झाडेझुडपे, पानाफुलांसकट महाराष्ट्राची विक्री सुरू आहे. माझ्या बोलण्यातून सत्ताधाऱ्यांना राग आला तरी चालेल; पण आता बोलण्याची वेळ आली आहे, अशी आक्रमक भूमिका शिंदे घेतली.
कोट..
सरकारच्या जंगलतोडीविरोधात राज्यातील २८ हजार गावे ४२४ लहान-मोठ्या शहरांत जनजागृती करण्यात येईल. यासाठी सरकारला विनंती करा, आरती करा, ढोल पिटा, निषेध नोंदवा, थाळी वाजवा, परंतु झाडे तोडू देऊ नका, आवाज उठवा, घाबरू नका हा संदेश सरकारपर्यंत पोचवा. या मोहिमेसाठी कलावंतासह अभिनेते, लेखक, कवी, निर्माते यांनीही पुढे यावे.
-सयाजी शिंदे, ज्येष्ठ अभिनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.