पुणे

#SaveShikharji तीर्थस्थळाच्या पावित्र्यासाठी जैनधर्मीयांचा मोर्चा

सकाळवृत्तसेवा

पुणे - आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, संमेद शिखरजी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कायम राखण्यासाठी आम्ही सर्व संत आपल्या प्राणांची बाजी लावण्यास तयार आहोत, असा निर्वाणीचा इशारा जैन संतांनी सोमवारी  केंद्र सरकार आणि झारखंडमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दिला. 

जैन धर्मीयांच्या पवित्र अशा ‘संमेद शिखरजी’ या पूजास्थळी मांसाहार, मद्यविक्री सुरू होण्याचा धोका निर्माण झाल्याने जैन साधू- साध्वी, तसेच समाजाने ‘सेव्ह शिखरजी’ ही मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत हा ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला. तत्पूर्वी झालेल्या प्रवचनाला आचार्य युगभूषणसुरीश्‍वरजी, मुनीश्री पुलकसागरजी, आचार्य रविचंद्रसुरीश्‍वरजी, पन्यास अरुणविजयजी महाराज यांच्यासह त्यांचे शिष्य आणि साध्वीजी उपस्थित होते. त्या वेळी संतांनी हा इशारा दिला. त्यानंतर हजारो जैन बांधवांनी ओसवाल पंचायत भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी ‘मूक मोर्चा’ काढला. चारही संप्रदायांच्या वतीने अचल जैन, ॲड. एस. के. जैन, अभय छाजेड, प्रवीण चोरबेले, बाळा ओसवाल, हिराचंद राठोड, शोभा धारिवाल, फत्तेचंद रांका, विजय भंडारी, शर्मिला ओसवाल आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन दिले. 

मोर्चाच्या यशस्वितेसाठी बालचंद कटारिया, सतीश शहा, राजेश घीवाला, विमल संघवी, राजेंद्र बांठिया, ललित गुंदेचा, रमेश गांधी, राकेश जैन, मिलिंद फडे, भरत सुराणा, रमेश राठोड, चिन्मय शहा, नितीन जैन, प्रशांत गांधी, आदेश खिंवसरा, विविध मंदिरांचे विश्‍वस्त आदींनी प्रयत्न केले.

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर महात्मा गांधी यांनी अहिंसात्मक लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आम्हीही अशाच प्रकारे शांततेने आंदोलनाची तयारी केली आहे, याचे भान केंद्र आणि झारखंड सरकारने ठेवावे. 
- मुनीश्री पुलकसागरजी महाराज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT