Savitribai Phule Pune University esakal
पुणे

Savitribai Phule Pune University : डिसेंबर अखेर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा

शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या सत्र परीक्षांना डिसेंबर अखेरीस सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. यंदाची परीक्षा विद्यापीठाच्या प्रचलित पद्धतीनुसार म्हणजेच लेखी पद्धतीने होणार आहेत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा डिसेंबर अखेरीस घेण्याचे नियोजन परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षांचे प्रवेश काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले असून, काही ठिकाणी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहेत.

त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना काही दिवसांनी सुरुवात होईल. महाविद्यालयील स्तरावरील अंतर्गत परीक्षा, प्रात्यक्षिके, तोंडी परीक्षा आदींबाबतची कार्यवाही करण्यालाही लवकर सुरुवात होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रथम वर्ष वगळता इतर वर्षांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू झाले आहे.

त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यामापन मंडळाने सत्र परीक्षांचे नियोजन करण्याला सुरुवात केली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना डिसेंबरच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत होउन निकाल, लवकर प्रसिद्ध होणे गरजेचे असते. त्यामुळे या परीक्षांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : खंडणीसाठी कानपूरच्या व्यावसायिकाचे अपहरण; पाच आरोपींना अटक

Maharashtra Cooperative Policy: महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवे धोरणात्मक बळ; युवक, तंत्रज्ञान आणि नव्या क्षेत्रांवर भर

Hingoli News : हिंगोलीत उन्हाचा पहिला बळी; 30 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

SCROLL FOR NEXT