Sawai Gandharva Bhimsen Festival 2019  
पुणे

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 11 डिसेंबरपासून 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - संगीतप्रेमींनो, आताच तारीख नोंदवून ठेवा... संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यावर्षी 11 ते 15 डिसेंबर या काळात मुकुंदनगर येथे होत आहे. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांची जन्मशताब्दी असल्याने त्यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या गायनाने यंदाच्या या 67 व्या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. महोत्सवाचा समारोप प्रभा अत्रे यांच्या गायनाने होईल. 

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय क्रीडा मंडळ संकुल येथे होणाऱ्या महोत्सवाची वेळ दुपारी चार ते रात्री दहा असेल. शनिवारी दुपारी चार ते रात्री बारा, तर शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी या संगीत महोत्सवाची वेळ दुपारी बारा ते रात्री दहा अशी असणार आहे.

दरवर्षी महोत्सवाची सुरुवात सनईवादनाने होते. यंदा हे वादन होणार नाही. रसिकांसाठी गेल्या वर्षीप्रमाणे पीएमपीएलच्या बसची सुविधा असेल. त्याबाबत सविस्तर माहिती नंतर देण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात देशातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील तसेच परदेशी कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत, असे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. 

11 डिसेंबर 
- पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांचे गायन 
- जयंती कुमरेश यांचे कर्नाटक शैलीतील वीणावादन 
- पं. माणिक वर्मा यांच्या शिष्या अर्चना कान्हेरे यांचे गायन 
- ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या सादरीकरणाने समारोप 

12 डिसेंबर 
- मशकुर अली खान यांचे शिष्य संदीप भट्टाचार्य यांचे गायन 
- झारखंडचे मनोज केडिया आणि मोर मुकुट केडिया यांचे सरोदवादन 
- पुण्यातील मंजिरी कर्वे-आलेगावकर यांचे गायन 
- पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने समारोप 

13 डिसेंबर 
- "धृपद सिस्टर्स' अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फळसणकर यांचे ध्रुपद गायन. अनुजा बोरुडे यांचे पखवाजवादन. 
- पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे गायन 
- अली अकबर खॉं यांचे शिष्य स्वित्झर्लंडचे केन झुकरमन यांचे सरोदवादन 
- पं. जसराज यांच्या गायनाने समारोप 

14 डिसेंबर 
- पं. नागराज हवालदार यांचे पुत्र ओंकारनाथ हवालदार यांचे गायन 
- तेजस उपाध्ये आणि शाकीर खान यांचे व्हायोलिन आणि सतार सहवादन 
- रामकृष्ण मठाचे संन्यासी स्वामी कृपाकरानंद यांचे गायन 
- नृत्यांगना रिला होता यांचे ओडिसी नृत्य 
- जयपूर घराण्याच्या अश्‍विनी भिडे-देशपांडे यांचे गायन 
- डॉ. एल. सुब्रह्मण्यम यांच्या व्हायोलिनवादनाने समारोप 

15 डिसेंबर 
- ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य अतुल खांडेकर यांचे गायन 
- पं. उल्हास कशाळकर यांच्या शिष्या रुचिरा केदार यांचे गायन 
- फिरोज दस्तूर यांचे शिष्य चंद्रशेखर वझे यांचे गायन 
- प्रसिद्ध सतारवादक नीलाद्रीकुमार यांचे सतारवादन 
- पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट यांचे गायन 
- पतियाळा घराण्याचे गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे गायन 
- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गायनाने समारोप 

"सवाई'त प्रथमच 
संदीप भट्टाचार्य, मनोज केडिया, मोरमुकुट केडिया, अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फळसणकर, अनुजा बोरुडे (ध्रुपद सिस्टर्स), विराज जोशी, ओंकारनाथ हवालदार, तेजस उपाध्ये, स्वामी कृपाकरानंद, रीला होता, अतुल खांडेकर, रुचिरा केदार हे कलाकार प्रथमच या महोत्सवात कला सादर करणार आहेत. केन झुकरमन या परदेशी कलाकाराचे सरोदवादनही होणार आहे. 

तिकीट दर 
- खुर्ची (सीझन) : चार हजार, तीन हजार रुपये 
- खुर्ची (दर दिवशी) : 850 रुपये 
- भारतीय बैठक (सीझन) : 499 रुपये 
- भारतीय बैठक (दरदिवशी) : 200 रुपये 

तिकीट विक्री 
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकीट विक्री 1 डिसेंबर रोजी सकाळी नऊपासून सुरू होईल. www.esawai.com हे संकेतस्थळ तसेच पुढील ठिकाणी तिकिटे उपलब्ध असतील. 
- शनिपार येथील बेहेरे आंबेवाले 
- कमला नेहरू पार्कसमोरील शिरीष ट्रेडर्स 
- कोथरूड येथील नावडीकर म्युझिकल्स 
- अरण्येश्‍वर, सहकारनगर येथील अभिरुची फूड्‌स 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT