पुणे

सदरबझार मध्‍ये शिष्‍यवृतीचे वितरण

CD

सदरबझारमध्‍ये शिष्‍यवृतीचे वितरण

माळवदे कुटुंबीयांतर्फे आई-वडिलांच्‍या स्‍मृतीनिमित्त आर्थिक मदत

सातारा, ता. २१ : नगरसेवक शंकर माळवदे, सागर माळवदे व कुटुंबीयांतर्फे आई- वडिलांच्‍या स्‍मृतीनिमित्त आर्थिकद्दष्ट्या व गुणवंत विद्यार्थ्यांना रविवारी आर्थिक मदतीचे वितरण करण्‍यात आले.
हा कार्यक्रम भारतमाता नागरी सहकारी पतसंस्‍थेच्‍या वार्षिक सभेदरम्‍यान झाला. यावेळी संस्‍थेचे अध्‍यक्ष संदीप साखरे, संचालक सुजित जाधव, राहुल धुमाळ, सतीश कांबळे, राजेंद्र रजपूत, राजेंद्र भणगे, गणेश भोसले, कृष्णा जाधव, प्रवीण थोरात, वेणूताई यादव, सुनील भुतकर, सुजित शेख, विकास धुमाळ, चेतन सोळंकी, व्यवस्थापक विजय इंगवले, संतोष रसाळ, योगेश भोसले, गणेश शेलार यांच्‍यासह इतर मान्‍यवर उपस्‍थित होते.
माळवदे बंधू हा उपक्रम गेली पाच वर्षे राबवत आहेत. या कार्यक्रमात श्रुती महेश बनसोडे, लक्ष्मी शिव कांबळे, गौरव राजू कांबळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
आई-वडिलांचे शिक्षण हे फारच कमी होते; परंतु त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हा सर्वांना शिक्षण दिले. आर्थिक कारणामुळे कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यासाठी आई- वडिलांच्या आठवणी जपण्‍यासाठी हा उपक्रम राबवत आहोत. यासाठीची ठेव आम्‍ही भारतमाता नागरी सहकारी पतसंस्‍थेत ठेवली असून, त्‍यातून येणाऱ्या संपूर्ण व्‍याजातून ही मदत देण्‍यात येते. हा उपक्रम आगामी काळात अधिक व्‍यापक करणार असल्‍याचेही श्री. माळवदे यांनी यावेळी सांगितले.
....................................
फोटो :........ ५१६६२
सातारा : शिष्यवृत्तीचे वितरण करताना शंकर माळवदे. या वेळी संदीप साखरे, सुजित जाधव, राहुल धुमाळ, सतीश कांबळे व इतर मान्‍यवर.
.................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

Marathi News Live Updates: मुलाखती पुढे ढकलणे पात्र उमेदवारांवर अन्याय, मुख्यमंत्र्यांना निवेदन

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

SCROLL FOR NEXT