शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्या वाढणार  sakal
पुणे

शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्या वाढणार

दरवर्षीप्रमाणे मिळणार दिवाळीची सुट्ट्या

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिवाळीची सुटी पुन्हा वाढवून मिळणार आहेत. दिवाळीच्या सुट्या कमी झाल्या असल्यास दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे असणाऱ्या सुट्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) झाल्यानंतर घेता येतील, असे नमूद केलेले नवीन परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या घेता येणार आहेत.

दर शैक्षणिक वर्षात शाळांना जवळपास ७६ सुट्ट्यांचे नियोजन करणे अपेक्षित असते. त्यानुसार यापूर्वी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार २२ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली होती. परंतु यंदा पूर्व नियोजित राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) परीक्षा असल्यामुळे शिक्षण विभागाकडून शाळांना १० नोव्हेंबरपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या. दरम्यान, यंदा दिवाळीच्या सुट्ट्या कमी मिळत असल्याने शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सुट्ट्यांबाबत नुकतेच नवीन परिपत्रक काढले आहे.

दिवाळीच्या कमी झालेल्या सुट्ट्या समायोजित कराव्यात; शिक्षण संचालकांचा आदेश

‘‘राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना दिवाळी सणाच्या अनुषंगाने २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात आली होती. तसेच ११ नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. राज्यात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या कमी झाल्या असतील तर दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे असणाऱ्या सुट्ट्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन समायोजित कराव्यात, असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांना परिपत्रकाद्वारे दिला आहे.

शिक्षकांना मिळणार दरवर्षीप्रमाणे हक्काची दिवाळीची सुट्टी

‘‘यावर्षी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामुळे (नॅस) दिवाळीच्या सुट्टीचे कमी झालेले दिवस हे नाताळच्या सुट्टीस तसेच उन्हाळी सुट्टीस जोडून देण्याची सूचना शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण हे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नसल्यामुळे राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी द्यावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने यापूर्वीच केली होती.’’

- प्रा. मुकुंद आंधळकर, समन्वयक, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

‘‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या सुटीचे नियोजन राज्य सरकारच्या आदेशानुसार बदलले आहे. त्यानुसार ११ नोव्हेंबर रोजी सर्व शाळा सुरू होतील आणि १२ नोव्हेंबर रोजी घोषित केलेल्या शाळांमधील निवडक इयत्तांमधील निवडक विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होईल. त्यानंतर स्थानिक परिस्थितीनुसार सुधारित परिपत्रकामुळे याआधी रद्द झालेल्या सुट्या घेण्याचा आधिकार मुख्याध्यापकांना दिला आहे. त्यानुसार १३ किंवा १५ नोव्हेंबरपासून देखील काही शाळा सुट्टी घेऊ शकतील.’’

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, मुख्याध्यापक महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT