Schools Closed On 25th July In Pune Due to rain Esakal
पुणे

Pune Schools Closed: पुण्याला रेड अलर्ट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्त्वाचे आदेश, सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Pune Rains 2024: गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह पुण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह पुण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अशात आता पुणे शहरातील सर्व शाळांना आज २५ जुलै, २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे.

एक्सवर पोस्ट करत राज्यमंत्री मोहळ म्हणाले, "हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

दरम्यान लोणावळ्यात ढगफुटी सदृष्य पाऊस सुरू असून नगरपरिषदेने 25 आणि 26 जुलै रोजी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक व्हिडोओ शेअर करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Election: पुण्यात एकाच वार्डात शिवसेनेचे दोन AB फॉर्म! एका उमेदवाराने हातातून हिसकावला… फाडला… अन् गिळला! नेमकं काय घडलं?

Pune Municipal Election : आघाडीत बिघाडी, तर युतीत कुस्ती; खिरापतीसारखे एबी फॉर्म वाटल्याने पक्षांमध्ये अडचणी

Solapur News: द्राक्षबागायतदार संघ आक्रमक! पाच हजार टन बेदाणा भारतात आल्याचा संशय, सांगलीत चौकशी सुरू, अन्यथा आंदोलनाची तयारी!

केंद्र सरकारकडून नववर्षाची भेट! नाशिक-सोलापूरदरम्यान ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’; केंद्राकडून १९ हजार कोटींचा निधी!

Gopichand Padalkar : 'मराठी-कन्नड या दोन्ही भाषा माझ्यासाठी समान'; टीईटी परीक्षेबाबतही आमदार गोपीचंद पडळकरांचं महत्त्वाचं विधान

SCROLL FOR NEXT