School esakal
पुणे

पुण्यात मंगळवारपासून पुन्हा वाजणार शाळेची घंटा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग नियंत्रणात असल्याने इयत्ता १ली ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग नियंत्रणात असल्याने इयत्ता १ली ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून १ फेब्रुवारीपासून शाळा घडण्याचे आदेश आज (शनिवारी) काढण्यात आले. (Pune City Schools Reopening Updates)

ओमिक्रॉन विषाणूंचा प्रभाव वाढत असल्याने राज्य सरकारने १५ फेब्रुवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ओमिक्रॉनमुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी ९५ टक्के नागरिक घरीच उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली होती. पण पुण्यातील शाळा सुरू करण्यासाठी गडबड करू नये एक आठवडा वाट पाहिली पाहिजे अशी मागणी गेल्या आठवड्यात करण्यात आल्याने पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय घेण्याचे टाळले होते. आज अजित पवार यांनी घेतलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी आदेश काढले.

असे आहेत आदेश

- इयत्ता १ली ते १२वी चे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करता येतील

- शाळेची स्वच्छता निर्जंतुकीकरण आवश्‍यक आहे. थर्मलस्कॅनर, थर्मामिटर, आॅक्सिमिटर, साबण, सॅनिटायझर याची व्यवस्था करावी

- विद्यार्थ्यांना शाळात पाठविताना पालकांचे संमतिपत्र आवश्‍यक आहे

- शिक्षकांनी दोन्ही डोस घेतलेले असावेत. ज्यांचे दोन्ही डोस झाले नाही त्यांनी ४८ तास आधी कोरोना चाचणी करून त्याचा निगेटिव्हचा अहवाल शाळेत सादर करावा

- वर्गखोल्यांमध्ये सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे

- हे आदेश पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डालाही लागू आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT