पुणे

जि.प. उर्दू शाळा नाकिंदा येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट आविष्कार

CD

नाकिंदामधील विज्ञान प्रदर्शनात सर्जनशीलतेचा आविष्कार

महाबळेश्वर, ता. ७ ः राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक ऊर्दू शाळा, नाकिंदा येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक मॉडेल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
ग्रामपंचायत सदस्य झहीर डांगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली ‘चांद्रयान-३ रॉकेट विथ आदित्य-१’, स्मार्ट फार्मिंग सिस्टीम, धरण मॉडेल, मल्टिफंक्शन क्रेन, ऊर्जा निर्मिती प्रक्रिया, ज्वालामुखी, एअर कूलर, सौरमंडळ, जलविद्युत प्रकल्प, स्वयंचलित ध्वजवंदन यंत्र, प्रदूषण नियंत्रण प्रणाली, व्हॅक्युम क्लिनर, पवनचक्की, वॉटर सायकलिंग व पाण्याचे स्रोत आदी मॉडेल्स विशेष आकर्षण ठरली.
मेटगुताड केंद्राचे केंद्रप्रमुख डी. डी. ढेबे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या जिज्ञासेला चालना दिली व सर्वांचे कौतुक केले. ब्राइटलँड हॉटेलच्या सेल्स मॅनेजर अनिता मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत भविष्यात येथील विद्यार्थी इस्रोसारख्या संस्थेत नक्कीच पोहोचतील, असा विश्वास व्यक्त केला. श्री. निकम व श्री. पवार यांनी प्रत्येक मॉडेलची माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. माजी विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे व शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र भिलारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामपंचायत नाकिंदा उपसरपंच रफिक वारुणकर, असलम डांगे, नासिर बडाणे, तसेच अन्य मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शाहिस्ता शेख, आसिया पटेल व वसीम वारुणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक वसीम वारुणकर यांनी उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांचे आभार मानले.

05028
नाकिंदा ः शाळेतील विज्ञान प्रदर्शनाची पाहणी करताना शिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT