Motivational Story  sakal
पुणे

Motivational Story : आई-वडिलांच्या कष्टाची प्रियांकाला जाण

वडील आणि भाऊ सुरक्षारक्षक, आई घरकाम कामगार असे सगळेच कुटुंब कष्टकरी असल्याने घामाची किंमत काय असते याची जाण असलेल्या प्रियांकाने मी आई वडिलांचे कष्ट थांबवेन, अशी भावना व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : वडील आणि भाऊ सुरक्षारक्षक, आई घरकाम कामगार असे सगळेच कुटुंब कष्टकरी असल्याने घामाची किंमत काय असते याची जाण असलेल्या प्रियांकाने मी आई वडिलांचे कष्ट थांबवेन, अशी भावना व्यक्त केली.

कोथरूडच्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयात शिकणाऱ्या प्रियांका राम जोगदंडे हीने दहावी बोर्ड परीक्षेत कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय ८९ टक्के गुण मिळवले आहेत. या यशाबद्दल सागर कॉलनी या वस्ती भागातील रहिवाशांनी तिचे कौतुक केले.

प्रियांका म्हणाली की, शेती पिकेना म्हणून कर्जबाजारी झालेल्या माझ्या वडिलांनी जगण्यासाठी पुण्याचा मार्ग धरला. सुरक्षारक्षक म्हणून एका सोसायटीत काम करणे पत्करले. आईने घरकाम करून कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात रहायचे म्हणजे सोपे नाही. त्यात मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा अवाढव्य. त्यामुळे माझा मोठा भाऊ कृष्णा याला देखील काम करून शिक्षण घ्यावे लागत आहे. तो सुद्धा सुरक्षारक्षक म्हणून काम करतोय. त्याने शास्र शाखेची पदवी प्राप्त केली आहे.

मला जीव लावणाऱ्या माझ्या आजीचे याच वर्षी निधन झाले. त्या दुःखातून सावरत मी अभ्यास केला. शाळेतील मुख्याध्यापिका जयश्री जावळे व इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मला खासगी शिकवणीची गरज भासली नाही. आता पुढील शिक्षणासाठी मी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून आई-वडिलांचे कष्ट थांबवून त्यांना चांगले जीवन देण्याचे माझे स्वप्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मुंबई पुणे एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडीतही टोल वसुली, मनसेच्या दणक्यानंतर पैसे परत करण्याचं IRBचं आश्वासन

T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता

CM Yogi Adityanath: लाडक्या बहिणींना १५०० रुपये पेन्शन; योगी सरकारची मोठी योजना, पाहा कोणा-कोणाला होणार फायदा

Ind vs Pak: यालाच म्हणतात तयारी! पाकिस्तानला भिडण्यासाठी सूर्यकुमार यादव बनला ‘उस्मान तारिक’, नेट्समध्ये गोलंदाजीची हुबेहूब नक्कल

Satara Tourist Death: सातारच्या पर्यटकाचा राजगडावर हृदयविकाराने मृत्यू; सकाळीच्या सुमारास बालेकिल्ल्याचे दर्शन घेतलं अन् काय घडलं?

SCROLL FOR NEXT