selection of State Bank on merit for government banking transactions cooperative bank rural credit sakal
पुणे

Pune : शासकीय बँकिंग व्यवहारासाठी राज्य बँकेची गुणवत्तेवर निवड; ग्रामीण पतपुरवठ्यात वाढ शक्य

राज्य सहकारी बँक ३० जून २०२३ रोजी हा टप्पा पार करीत देशातील पहिली सहकारी बँक ठरली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळांकडील निधी गुंतविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस पात्र ठरविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य सहकारी बँक सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असून, या निर्णयामुळे बँकेला अधिक सक्षम करण्यासह ग्रामीण पतपुरवठ्यात वाढ करणे शक्य होणार आहे.

राज्य सार्वजनिक उपक्रमांच्या अतिरिक्त निधीची गुंतवणूक बँकांमध्ये करण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार अशा गुंतवणुकीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीयकृत बँका आणि किमान चार हजार कोटींचे नक्त मूल्य (नेटवर्थ) असलेल्या बँका पात्र ठरत होत्या. परंतु आजपर्यंत देशातील कोणत्याही सहकारी बँकेने चार हजार कोटी रुपये नक्त मूल्यांचा टप्पा पार केला नव्हता. त्यामुळे सहकारी बॅंका शासकीय गुंतवणुकीसाठी पात्र ठरत नव्हत्या.

राज्य सहकारी बँक ३० जून २०२३ रोजी हा टप्पा पार करीत देशातील पहिली सहकारी बँक ठरली. राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे आर्थिक सक्षमतेचे सर्व निकष पूर्ण केल्यानंतर राज्य बँकेत शासकीय गुंतवणूक व्हावी, यासाठी बँकेने पाठपुरावा केला होता. वित्त विभागाच्या शिफारशीनुसार १९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दोन वर्षांत ६०० कोटींहून अधिक निव्वळ नफा

राज्य सहकारी बँकेने गेल्या ११ वर्षांपासून लेखापरीक्षणात सतत ‘अ’ दर्जा मिळविला आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता (सीआरआर) १८.०४ टक्के असून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार किमान ९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या दोन वर्षांत बँकेने ६०० कोटींहून अधिक निव्वळ नफा कमावला आहे. बँकेने प्रथमच माहिती सुरक्षा व्यवस्थापनासाठीचे ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त केले आहे.

राज्य सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेत सहकार क्षेत्राबाबत विश्वास दाखविला, त्याबद्दल राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार. शासकीय गुंतवणुकीसाठी राज्य बॅंकेची निवड होणे अभिमानास्पद आहे. या निर्णयामुळे सहकार चळवळीला निश्चितच बळ प्राप्त होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी सक्षम होईल.

- विद्याधर अनास्कर, प्रशासक- महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना; संजू सॅमसन, जसप्रीत बुमराहला विश्रांती? कशी असेल प्लेईंग XI?

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला इडली-पोह्याचा कंटाळा आलाय? मग बनवा झटपट सुरतचा फेमस लोचो, लगेच नोट करा रेसिपी

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Panchang 19 September 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

SCROLL FOR NEXT