Dr SB Mujumdar
Dr SB Mujumdar sakal
पुणे

कुलगुरूंची निवड निरपेक्ष व्हावी - डॉ. मुजूमदार

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाते यांच्या सेवकाळ समाप्तीनिमित्त आयोजित सेवागौरव समारंभात आयोजित केला होता.

पुणे - ‘सध्या राज्यात कुलगुरू निवडी प्रक्रियेबाबत जे सुरू आहे ते अतिशय क्लेशदायक आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींनी एकत्र येत हा निवडीबाबतचा बदल घडवावा. कुलगुरू यांची निवड निरपेक्ष व्हावी.,’ असे परखड मत ‘सिंबायोसिस शिक्षण संस्थे’चे संस्थापक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाते यांच्या सेवकाळ समाप्तीनिमित्त आयोजित सेवागौरव समारंभात आयोजित केला होता. यावेळी डॉ. मुजुमदार, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ. के. एच. संचेती आणि ‘पर्सिस्टंट’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, डॉ. अंजली कुरणे, डॉ. संजीव सोनवणे यांचा सेवा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अधिसभा सदस्य सुनेत्रा पवार, डॉ. करमळकर यांच्या पत्नी रोहिणी करमळकर, डॉ. उमराणी यांच्या पत्नी महानंदा उमराणी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

डॉ. करमळकर म्हणाले, ‘विद्यार्थीदशेत असताना मी विद्यापीठात आलो. छोट्याशा गावातून विद्यापीठात आल्यावर परदेशात आलोय असे वाटले होते. इथेच शिकलो, इथेच डॉक्टरेट मिळवली, इथेच प्राध्यापक झालो, इथेच विभागप्रमुख झालो आणि इथेच कुलगुरू देखील झालो. विद्यापीठाने खूप काही दिलं, त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न गेल्या ४० वर्षाच्या कार्यकाळात केला. डॉ. उमराणी म्हणाले, ‘उच्च शिक्षणात केवळ गुणांच्या आधारे नाही तर विश्लेषण, चिकित्सा यावर भर द्यायला हवा.’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT