Senior citizen was robbed
Senior citizen was robbed Sakal
पुणे

कर्वे रस्ता परिसरात भरदिवसा ज्येष्ठ नागरीकाला लुबाडले

सकाळ वृत्तसेवा

पुणे - धुम्रपान करण्यासाठी रस्त्याच्याकडेला थांबलेल्या एका ज्येष्ठ नागरीकाला चोरट्यांनी भरदिवसा आठ फुट खोल नाल्यात ढकलून देत मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या जबरदस्तीने चोरुन नेल्या. हि घटना कर्वे रस्त्यावरील मृत्युंजयेश्‍वर मंदिराजवळ मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर बेशुद्ध पडलेल्या ज्येष्ठ नागरीकास अन्य नागरीकांनी बाहेर काढले. ज्येष्ठ नागरीकाबाबत घडलेल्या या घटनेने ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी उदय पेंडसे (वय 59, रा. कर्वे रस्ता) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पेंडसे हे कर्वे रस्ता परिसरात राहतात. मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे धुम्रपान करण्यासाठी घराजवळील मृत्युंजयेश्‍वर मंदिर परिसरात गेले होते. तेथेच नाल्याच्या दिशेला तोंड करुन ते थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या चोरट्यांनी त्यांना पाठीमागून नाल्यात ढकलून दिले. त्यानंतर ते सात ते आठ फुल खोल नाल्यामध्ये पडले.

काही कळण्याच्या आतच चोरट्यांनीही नाल्यामध्ये उडी मारुन पेंडसे यांच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या जबरदस्तीने काढून घेतल्या. त्यावेळी त्यांना मारहाणही केली. त्यानंतर चोरटे नाल्यातुनच पुढे पसार झाले. दरम्यान, या सगळ्या घटनेमध्ये घाबरून पेंडसे बेशुद्ध पडले. स्थानिक नागरीकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर ते त्यांच्या मदतीला धावून गेले. नागरीकांनी त्यांना नाल्याबाहेर काढले. त्यांची तब्येत ठिक झाल्यानंतर पेंडसे यांनी अलंकार पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पेंडसे यांना लुबाडण्यात आलेल्या परिसरातच काही महिन्यापुर्वी नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्यांना विरोध केल्याच्या कारणावरुन ज्येष्ठ नागरीकास जबर मारहाण करण्यात आली होती. संबंधित ज्येष्ठ नागरीक पोलिसात फिर्याद दाखल करण्यासाठी गेल्यानंतर आरोपी व पोलिसांनीही त्यांच्यावर दबाव आणून गुन्हा दाखल करण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरकांना या परिसरात चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT