प्रतिष्ठित व्यक्तीच्या सुनेचा विनयभंग;
आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ ः शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या सुनेचा विनयभंग करणाऱ्या नोकरास न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे. राजू हणमंतु भंडारे असे आरोपीचे नाव आहे.
२६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दीडच्या सुमारास पीडित महिला घरातील कामे संपवून स्वयंपाकघरात जेवण आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी घरातील नोकर राजू भंडारे याने गेट बंद करण्याचा बहाणा करून स्वयंपाकघरात प्रवेश केला व महिलेचा विनयभंग केला. पीडितेने जाब विचारला असता, चुकून हात लागल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आरोपी पुन्हा स्वयंपाकघरामागील गेटचे कुलूप लावून स्वयंपाकघरात आला. पीडितेला अश्लील व लज्जास्पद भाषेत बोलून शरीरसुखाची मागणी केली आणि पुन्हा विनयभंग केला. घाबरलेल्या पीडितेने डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची सासू व शेजारील व्यक्तींनी महत्त्वाची साक्ष दिली.
आरोपी हा पीडितेच्या घरातील विश्वासू नोकर असतानाही त्याने विश्वासघात करून विनयभंग केल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत, तर आरोपीतर्फे ॲड. महेश सोलनकर यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.