Zika virus sakal
पुणे

Zika Virus : पुण्यात ‘झिका’चा सातवा रुग्ण

शहरात झिका विषाणूंचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण मंगळवारी डहाणूकर कॉलमीमध्ये आढळला. आतापर्यंत आढळलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यापैकी कोणालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात झिका विषाणूंचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण मंगळवारी डहाणूकर कॉलमीमध्ये आढळला. आतापर्यंत आढळलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यापैकी कोणालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.

डहाणूकर कॉलनी येथील ४५ वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. या रुग्णाला झिकाची सौम्य लक्षणे आहेत. यापूर्वी एरंडवणे भागातील चार आणि मुंढवा परिसरातील दोन रुग्णांना झिकाचे निदान झाले आहेत. त्यानंतर आता शहराच्या डहाणूकर कॉलनीमध्ये सातवा रुग्ण आढळला. यात सात रुग्णांमध्ये पाच महिला असून दोन पुरुष आहेत.

पाच महिलांमध्ये दोन गर्भवती असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एडिस इजिप्ती या डासाच्या मादीपासून झिकाचे संसर्ग होतो. हा डास चावल्यानंतर झिकाचा विषाणू शरीरात प्रवेश करतो. त्या पार्श्वभूमिवर महापालिकेकडून रुग्ण आढळलेल्या घरांमध्ये आणि भोवतालच्या एक किलोमीटर भागात फवारणी करण्यात येत असल्याची विभागातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

Raigad Dhangar Shetkari News: पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळांची शेकडो किमीची पायपीट; वाढता उष्मा चारा पाण्याचं संकट, शिक्षणापासून वंचित पिढी..

SCROLL FOR NEXT