Pune University
Pune University Sakal
पुणे

ऑक्सिपार्कचा निर्णय रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune University) व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून प्रवेशासाठी (Admission) पैसे घेणारा ‘एसपीपीयू ऑक्सिपार्क’ (SPPU Oxypark) चा निर्णय (Decision) वादग्रस्त ठरल्याने तो विद्यापीठावरच (University) बूमरँग झाला आहे. या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रात तर पडसाद उमटलेच पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी देखील विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून हे परिपत्रक त्वरित रद्द करा असे आदेश देत झाडाझडती घेतली. त्यामुळे अवघ्या २४ तासाच्या आत परिपत्रक रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. (Shame on the University for Revoking Oxyparks Decision)

विद्यापीठाचे उत्पन्न घटल्याने व विद्यापीठ फंडाची रक्कम कमी होत असल्याने विद्यापीठाची आर्थिक स्थिती नाजूक होत आहे. त्यासाठी नवे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी विद्यापीठात सकाळी व संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांकडून शुल्क घेऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास ‘एसपीपीयू ऑक्सिपार्क’ असे नाव देण्यात आले. याबाबत विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात देखील उल्लेख आहे.

२१ जून पासून ऑक्सिपार्क योजना सुरू होणार होती. त्यामध्ये फिरायला नागरिक येणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येक महिन्यासाठी एक हजार शुल्क किंवा सहा महिन्यांसाठी साडेपाच हजार आणि वार्षिक शुल्क एकदम भरल्यास दहा हजार रुपये भरून सदस्यत्व दिले जाणार होते. त्यातून विद्यापीठातील सुविधा वापरणे व एक कार्यक्रम घेतला जाणार होता. त्यानुसार कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी शुक्रवारी (ता. ११) हे परिपत्रक काढले.

परिपत्रक जाहीर झाल्यानंतर त्यावर नागरिक, विद्यार्थी संघटनांकडून टीकेची झोड उठली. विद्यापीठातील काही प्राध्यापक, अधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. शासकीय जमीन असताना फिरायला येण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क कसे काय घेता असा प्रश्‍न उपस्थित केला गेला. हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे अन्यथा आंदोलनचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सकाळी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विद्यापीठाने हा निर्णय कसा काय घेतला याची चौकशी केली. अशा प्रकारे शुल्क घेणे अयोग्य आहे, त्वरित परिपत्रक रद्द करा असे आदेश दिले, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सामंत यांनी ट्विट करून या निर्णय स्थगित करण्यास सांगितले असून, या योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत सांगितले. दरम्यान, "एसपीपीयु ऑक्सिपार्क' योजनेत क्रीडा व अन्य सुविधा समाविष्ट करून योजना सर्वसमावेशक व व्यापक करण्याच्या दृष्टीने पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिपत्रकास स्थगित देण्यात येत असल्याचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी नव्या परिपत्रकात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT