पुणे

बापाच्या वेदनेला लेकीचा मायेचा पदर

CD

बापाच्या वेदनेला लेकीच्‍या मायेचा पदर

शरद पवारांच्‍या वेदना सुप्रिया सुळेंनी टिपल्‍या अन्‌ चर्चेत आला तो क्षण ‘हळवा’

राहुल लव्हाळे : सकाळ वृत्तसेवा

सातारा, ता. १० : रयत शिक्षण संस्‍थेचे संस्‍थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काल राजकारणापलीकडचे एक हळवे नाते पाहायला मिळाले. आयुष्‍यभर झिजलेल्‍या पित्‍यास कार्यक्रमप्रसंगी होणारी वेदना लेकीने टिपली आणि वेदनेवर फुंकर घालण्‍यासाठीच जणू मायेचा पदर पुढे आल्‍याचा तो क्षण सातारकरांनी अनुभवला.
वयोमान, ताण, थकवा आणि नरम प्रकृती तरीही रयत शिक्षण संस्थेप्रती असलेली निष्ठा खासदार शरद पवार यांना साताऱ्यात घेऊन आली. वयोमान आणि थकलेल्या शरीराची पर्वा न करता आपल्या दैवताला अभिवादन करण्यासाठी साताऱ्याच्या कर्मवीर समाधी परिसरात खासदार पवार शनिवारी सकाळी ठीक साडेआठ वाजता डेरेदाखल झाले होते. मात्र, कार्यक्रमात विविध मासिकांचे प्रकाशन, अनेक पुस्तकांचे विमोचन, गुणवंत रयत सेवकांचा सन्मान अशा विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमाचा कालावधी वाढत चालला होता. व्यासपीठावर पुस्तकांचे विमोचन आणि गुणवंतांचे सत्कार सोहळे सुरू होते. श्री. पवार प्रत्येक सत्कारार्थीला तितक्याच आपुलकीने दाद देत होते; पण उभं राहताना होणारी त्यांची शारीरिक ओढाताण पाहून खासदार सुप्रिया सुळे अस्वस्थ झाल्या. समोर बसलेल्या हजारो नजरांना राजकारणातील ‘भीष्म पितामह’ शरद पवार दिसत होते; पण सुप्रिया सुळेंना मात्र तिथे फक्त आपला ‘थकलेला पिता’ दिसत होता अन्‌ पित्‍याला होणारी वेदना या लेकीच्या नजरेतून सुटली नाही.
आपल्या वडिलांना जास्त वेळ उभं राहावं लागू नये, त्यांच्या प्रकृतीवर ताण येऊ नये, या काळजीने खासदार सुळे स्वतः पुढे सरसावल्या. त्या थेट सूत्रसंचालक आणि निवेदकांकडे गेल्या. कार्यक्रम अनावश्यक लांबणं, अतिरिक्त औपचारिकता आणि फाफटपसारा टाळावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. व्यासपीठावर आसनस्थ असूनही स्वतः खुर्चीतून उठून त्या पुढे सरसावल्या. व्यासपीठावर सक्रिय झाल्या. जणू काही आपल्या वडिलांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेत त्या संयोजकांना मदत करू लागल्या. कार्यक्रम सुरळीत आणि वेळेत पार पडावा, यासाठी पुढाकार घेत राहिल्या. त्‍यातून साताऱ्यातील कर्मवीर समाधी परिसर या हळव्या, भावनिक प्रसंगाचा साक्षीदार ठरला.
................................
वातावरणही भारावलं...
एकीकडे वडिलांची जबाबदारी सांभाळणारी मुलगी... आणि दुसरीकडे कर्तव्यपूर्तीसाठी प्रकृतीची पर्वा न करता उभा असलेला पिता... हा प्रसंग उपस्थितांच्या मनाला अक्षरशः स्पर्शून गेला. राजकारणातील दिग्गज नेत्याऐवजी तिथे केवळ एक काळजीत पडलेली ‘लेक’ दिसत होती. राजकारणातील रणधुमाळीत व्यस्त असणारी ही जोडी आज एका सामान्य बाप-लेकीच्या अद्वैत रूपात सर्वांसमोर होती. वडिलांची सावली होऊन उभ्या राहिलेल्या सुप्रिया सुळे आणि थकलेल्या अवस्थेतही ‘रयते’साठी पाय रोवून उभे राहिलेले शरद पवार... या दृश्याने कर्मवीर समाधी परिसरातील वातावरण अधिकच भावुक झालं होतं.
...........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT