Sharad Pawar Esakal
पुणे

Sharad Pawar: शरद पवारांची प्रकृती उत्तम; भेटीगाठींना सुरुवात, गोविंदबागेत नागरिक व कार्यकर्त्यांशी साधला संवाद

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती आज व्यवस्थित असून त्यांनी गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मिलिंद संगई, बारामती

बारामती, ता. 12- ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती आज व्यवस्थित असून त्यांनी गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

शनिवारी (ता. 11) विद्या प्रतिष्ठानची बैठक सुरु असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. दिल्ली येथील वास्तव्यामुळे प्रदूषणामुळे त्यांच्या घशाला सूज आली होती.

काल त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने विश्रांतीचा सल्ला दिला होता अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. रमेश भोईटे यांनी दिली. काल शारदोत्सवाच्या कार्यक्रमालाही त्या मुळे शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत.

दरम्यान रविवारी (ता. 12) सकाळी पुन्हा डॉ. रमेश भोईटे यांनी शरद पवार यांची तपासणी केली. त्यांची तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. आजचा दिवस त्यांनी विश्रांती घ्यावी असा सल्ला त्यांना दिल्याचेही डॉ. भोईटे म्हणाले. पुरंदर तालुक्याचा रविवारचा नियोजित दौरा रद्द करण्याचाही सल्ला डॉक्टरांनी पवार यांना दिला आहे.

दरम्यान दिवाळीच्या काळात पवार कुटुंबिय बारामतीत वास्तव्यास असते. दिवाळीला राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्ते व नागरिकांना शरद पवार गोविंदबागेत भेटत असतात. यंदा पाडव्याच्या दिवशी (ता. 14) श्री महावीर भवन येथे संध्याकाळी पाच वाजता बारामतीच्या व्यापाऱ्यांशीही शरद पवार संवाद साधणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT