sharad_pawar 
पुणे

शरद पवारांनी खडसावल्यानंतर अजित पवार म्हणाले...

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. शहरातील कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरू आहे. त्यात त्यांनी खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी घेतल्या जाणाऱ्या बिलांच्या तक्रारीबाबत यंत्रणेला खडसावले.  

या वेळी शरद पवार यांनी शहरातील खासगी रुग्णालयांकडून घेतल्या जाणाऱ्या बिलांबाबत नाराजी व्यक्ती केली. ते म्हणाले, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांची बैठक घ्या. त्यांची उपचार आणि बिलांबाबत बोला. बिलांच्या तक्रारी येत आहेत. मात्र, तरीही सगळे गप्प का आहेत?  

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, खासगी रूगणालय व्यवस्थापनांशी पाच बैठका घेऊन चर्चा केली आहे. उपचार न देणारे आणि अधिक पैसे घेणारया रूग्णालयांविरोधात फौजदारी दाखल करीत आहोत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, वारंवार विनंती, सूचना करूनही विशेष म्हणजे शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हमधून सांगूनही खासगी रूग्णालय एेकत नसतील; कठोर अर्थात परवाने रद्द करा, पण आता हे करणे योग्य नाही. मात्र, पर्याय नाही. लक्षणे नसलेलया रूग्णांना घरीच ठेवा. मात्र, वस्त्यांमधील रूग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्येच ठेवा. बचा रिपोर्ट वेळेत आलाच पाहिजे. खासगी लॅबची क्षमता आणि प्रत्यक्ष काम हे तपासा. रिपोर्ट २४ तासात हवा. लॅबच्या अडचणी जाणून त्यांना महापालिकेने आर्थिक मदत करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे रेल्वेसेवा आजही बंद राहणार

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

SCROLL FOR NEXT