Sharad Pawar says as long as we are all united no can disturb lok sabha election politics Sakal
पुणे

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

आज बारामतीच्या निवडणुकीची उत्सुकता अमेरिकेला सुद्धा आहे. तुमच्या निर्णयाचे महत्त्व महाराष्ट्र बरोबरच बाहेरच्या लोकांना सुद्धा आहे.

सकाळ वृत्तसेवा

काटेवाडी : आज बारामतीच्या निवडणुकीची उत्सुकता अमेरिकेला सुद्धा आहे. तुमच्या निर्णयाचे महत्त्व महाराष्ट्र बरोबरच बाहेरच्या लोकांना सुद्धा आहे. कोणी काही म्हणो देशाची सत्ता कुणाच्याही ताब्यात असो.

जोपर्यंत आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत बारामतीकरांना कोणी धक्का लावू शकत नाही. तुमचा निर्णय हा बारामतीच्या व महाराष्ट्राच्या हिताचा होईल अशी मला खात्री आहे, असा निर्धार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

बारामती येथे लेंडी पट्टी जुना मोरगाव रोड येथील मैदानात रविवारी (ता. ५) महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांची सांगता सभा पार पडली. यावेळी या सभेला मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मागील अनेक वर्ष आपण शेवटची सांगता सभा मिशन हायस्कूलच्या प्रांगणात घेत होतो. मात्र यंदा ते शक्य झाले नाही. राज्याची सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी ती जागा आपल्या ताब्यात घेतली.

ठीक आहे, त्यामुळे फारसा फरक पडत नाही. कुणी आपली जागा अडवली तरी आपले नुकसान झाले नाही. मी येथे पाहतो आहे प्रचंड संख्येने सर्वसामान्य माणूस एकवटला आहे. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे.

संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. कण्हेरी येथे आपल्या प्रचाराची पहिली सभा पार पडली. त्यावेळी तेथे कोणीतरी एक मनुष्य होता. जरा वेगळा वाटला मी त्यांना बोलावलं. विचारलं कुठून आलात तर ते म्हणाले अमेरिकेतून आलो आहे.

त्यांनी सांगितले अमेरिकेमध्ये भारतात सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत भयंकर उत्सुकता आहे. अमेरिकेमधील न्यूयॉर्क टाइम्स नावाचे एक वृत्तपत्र आहे. त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवले, असे सांगितले. न्यूयॉर्क वरून हा माणूस कण्हेरीला आला. त्यामुळे तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे महत्त्व मोठे आहे.

महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षितता असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते यामधील कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचा वापर करत नाही. त्यासाठी आपण एक निर्णय करायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व मित्र पक्षाचे सर्व उमेदवार निवडून देऊ, असे यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. या सभांचा ताण त्यांच्या शरीर प्रकृतीवर आज दिसून आला. भाषणामध्ये देखील त्यांनी आपला घसा बसला असल्याचा उल्लेख केला. तसेच चेहऱ्यावर थकवा देखील होता. भाषणासाठी शरद पवार उभे राहताच कार्यकर्त्यांनी घोषणांनी सभा मंडप दणाणून सोडला. शरद पवार यांचा घसा बसल्यामुळे त्यांना स्पष्टपणे बोलता येत नव्हते. त्यांचा आवाज ऐकून अनेक कार्यकर्ते तसेच येथे उपस्थित असणारे पवार कुटुंबीय देखील हळहळले.

सभेच्या ठिकाणी अलोट गर्दी....

या सांगता सभेला बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड आदी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सभेच्या ठिकाणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर शाहिरांचे पोवाडे सादर झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी या पोवाड्यांवर नाचून आनंद व्यक्त केला. मागील अनेक निवडणुकांमध्ये अशा प्रकारची सांगता सभा आम्ही पाहिलं नाही अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.

प्रतिभाकाकींच्या हातात शरद पवारांचा फोटो...

सभेच्या ठिकाणी पवार कुटुंबीय उपस्थित होते. या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले ते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाकाकी पवार यांनी. त्यांच्या हातामध्ये शरद पवार यांचा फोटो उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. संपूर्ण पवार कुटुंब साहेबांच्या पाठीशी आहोत असा संदेश जणू यावेळी प्रतिभा पवार यांनी आपल्या कृतीतून दिला, अशी ही चर्चा कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्वसामान्य लोकांमध्ये सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk’s Tesla: टेस्लाची गाडी आता मुंबईत धावणार; BKC मध्ये पहिलं शोरूम उघडणार, किती आहे किंमत?

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं?

Medical College: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; आमदार जगतापांनी घेतली भेट

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

SCROLL FOR NEXT