Sharad Pawar sakal
पुणे

Sharad Pawar : सहा महिन्यात राज्यात आपले सरकार असेल ;शरद पवार

" यावेळी काहीही झालं, तरी आपण राज्य सरकार ताब्यात घेणार आहोत. मात्र तुमची एकजूट महत्वाची आहे, तुमच्या एकजुटीच्या बळावर काहीही अशक्य नाही. तुमचे अनेक प्रश्न असतील, काही सुटले असतील.

विजय मोरे ः सकाळ वृत्तसेवा

उंडवडी : " यावेळी काहीही झालं, तरी आपण राज्य सरकार ताब्यात घेणार आहोत. मात्र तुमची एकजूट महत्वाची आहे, तुमच्या एकजुटीच्या बळावर काहीही अशक्य नाही. तुमचे अनेक प्रश्न असतील, काही सुटले असतील. मी म्हणत नाही शंभर टक्के प्रश्न सुटले, परंतु जे प्रश्न राहिले आहेत. त्या प्रश्नासाठी मी शासकीय अधिकाऱ्यांना बोलवतो. तुमच्यापैकी काहीजण माझ्याकडे या. जे प्रश्न सुटतील ते सुटतील नाहीतर हे राज्य आपले नाही. ते ऐकतील असं वाटत नाही, जर त्यांनी ऐकलं नाही, तर सहा महिन्यात आपलं सरकार असेल. मग मात्र आपले सर्वच प्रश्न सुटतील." असे मत केंद्रीय माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथे आयोजित जनसवांद सभेत केले.

यावेळी युवा नेते योगेंद्र पवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगनाथ शेवाळे, सदाशिव सातव, सतिश खोमणे, तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, वनिता बनकर, विठ्ठल जराड, सरपंच शोभा कांबळे, विनायक गवळी, अमोल गवळी, अक्षय गवळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पवार यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, उंडवडी सुपे, सुपे या गावांचा दौरा केला. यावेळी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी गावातील अपूर्ण कामाची माहिती ग्रामस्थांकडून घेतली. त्यांचे प्रश्न समजावून घेतले.

शरद पवार पुढे म्हणाले, " मी, जरी इथे अनेक वर्षातून आलो असलो तरी या गावातील लोकांनी एकत्र येऊन जो निकाल आता घेतला आहे. तो सर्वांच्या समोर आहे, निवडणुकीच्या काळात लोक बोलत नव्हते त्यावेळी आमचेही सहकारी चिंतेत असायचे पण मी त्यांना सांगायचं ते बोलत नसले तरी काम चोक करतात आणि ते त्यांनी मतदानातून दाखवून दिले आहे.

दूधाला सरकारने अनुदान देणे गरजेचे होते. मात्र दूधाला दर नसल्यामुळे आणि अनुदान मिळत नाही. त्यामुळे शेतक-यांचा दूध व्यावसाय अडचणीत आहे. तसेच कांद्याची निर्याद बंद असल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आला आहे. असे अनेक प्रश्न आहेत. जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतील सर्व अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT