राेपवाटिकेच्या १३ शाखांद्वारे महिलांना राेजगार
विडणीतील शारद भाेसलेंच्या नावीन्यपूर्ण प्रयाेगातून महाराष्ट्रभर राेपांना मागणी
अशाेक सस्ते : सकाळ वृत्तसेवा
आसू : निसर्ग महिला बचत गटाची २०११ मध्ये स्थापना करून, त्याद्वारे स्वत:च्या शेतात राेपवाटिका व्यवसाय सुरू झाला आणि याेग्य व्यवस्थापन, राेपांची मुलाबाळांप्रमाणे काळजी घेण्याची हाताेटी यातून साधलेल्या किमयेतून पश्चिम महाराष्ट्रात तब्बल १३ शाखा सुरू करणाऱ्या शारदा सचिन भाेसलेंची यशस्वी भरारी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
शारदा सचिन भोसले या ग्रामीण भागातील एक सामान्य महिला. २०११ मध्ये निसर्ग महिला बचत गटाची स्थापना करून स्वतःच्या शेतात त्यांनी रोपवाटिका व्यवसाय सुरू केला. आज याच रोपवाटिकेच्या पश्चिम महाराष्ट्रात १३ शाखा उभ्या आहेत. यातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. १५ वर्षांच्या काळातील त्यांचा हा प्रवास जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीचा आहे.
शारदा भोसले या उच्चशिक्षित आहेत. माहेरची शेती असल्याने त्यांना वडिलांकडून व्यावसायिक शेतीचे बाळकडू मिळाले. सासरी आल्यानंतर त्यांनी विडणी गावासह परिसरातील महिलांना एकत्रित करून निसर्ग महिला बचत गटाची स्थापना केली. या माध्यमातूनच त्यांनी स्वतःच्या शेतात पालेभाज्या, फळे आणि फूलझाडांची निसर्ग रोपवाटिका सुरू केली.
संघटन कौशल्य, अथक मेहनत, प्रामाणिकपणा व कर्तृत्वाच्या जोरावर एक दोन नव्हे, तर त्यांनी विडणीसह पश्चिम महाराष्ट्रात फलटण, पाडेगाव, आळेफाटा, उरळीकांचन इत्यादी ठिकाणी तब्बल १३ शाखा सुरू केल्या. पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या रोपांना चांगली मागणी आहे. सर्व शाखांचा व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करून पारदर्शकता आणली आहे. रोपनिर्मितीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ जाणून घेऊन त्यांनी रोपवाटिका उद्योगामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
या उद्याेगातून त्या हजारो महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यात यशस्वी झाल्या आहेत. वर्षभर महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. महिलांचा विकास साधण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
निसर्ग रोपवाटिकेच्या माध्यमातून काम करत असतानाच त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन फलटण येथील लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या संचालकपदी त्यांची निवड करण्यात आली. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत त्याद्वारे माहिलांसाठी विविध आरोग्य शिबिरे, सौंदर्य स्पर्धा, तसेच विविध स्पर्धा, सांस्कृतिक व व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
शारदा भोसले यांचे पती सचिन रघुनाथ भोसले हे प्रसिद्ध युवा उद्योजक असून, त्यांच्या शिवजल ग्रुपचे रिअल इस्टेटमध्ये खूप मोठे नाव आहे. त्यांच्या माध्यमातून नाईकबोमवाडी, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक गरजू महिलांना कमी किमतीत हक्काची घरे मिळाली आहेत. शारदा भोसले यांच्या यशामध्ये त्यांचे पती सचिन भोसले, सासू, सासरे, मुलांचा मोठा वाटा आहे.
...................................
महिलांनी धैर्याने पुढे यावे
पारंपरिक शेती करत असताना आपले जीवनमान उंचावण्यासाठी महिला बचत गटामार्फत आधुनिक रोपवाटिका उभी करण्याचा संकल्प केला. त्यात यश मिळाले. ग्रामीण भागातील महिलांनी जिद्दीने पुढे आल्यास त्याही उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतात, हे मी सिद्ध केले आहे. त्यामुळे महिलांनी मोठ्या धैर्याने पुढे येणे गरजेचे आहे, असे शारदा भाेसले आवर्जून सांगतात.
..........................................
फोटो :..............ASU26B02582
शारदा भोसले
...............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.