पुणे

उपसरपंच निवडीची गावोगावी उत्सुकता

सकाळवृत्तसेवा

शेटफळगढे - जिल्ह्यातील जवळपास २२२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता गावोगावी नवीन उपसरपंच कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे; परंतु विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या सरपंचासह इतर सदस्यांना किमान दीड महिना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

सरपंचाची थेट जनतेतूनच निवड झाल्याने या पदासाठी होणाऱ्या गावोगावच्या सर्व घडामोडी थांबल्या आहेत; परंतु उपसरपंच पदासाठी सरपंचाप्रमाणे हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच १६ ऑक्‍टोबरला जरी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या तरी प्रत्यक्षात विद्यमान सरपंच व उपसरपंच याचा कालावधी डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे हा कालावधी संपल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांचा कालावधी सुरू होणार आहे.

मात्र, असे असले तरी गावोगावी आता इच्छुकांनी उपसरपंच होण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. यासाठी ज्या गावात एकाच पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले आहे त्या गावात राजकीय बेरजेचे गणिते कायम टिकविण्यासाठी उपसरपंचपदाची विभागणी करून प्रत्येकाला खूष ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे; तर ज्या ठिकाणी काठावरचे बहुमत आहे त्या ठिकाणी उपसरपंचपदासाठीचे आवश्‍यक ते बहुमत मिळविण्यासाठी आर्थिक उलाढाल होऊन सदस्य फोडण्याचे राजकारणही आगामी दीड महिन्यात केले जाणार आहे. त्यामुळे गावोगावी सध्या उपसरपंच कोण होणार, यांचीच उत्सुकता लागली आहे.

सरपंचांना जादा अधिकार...
सरपंचाच्या अध्यक्षतेखाली नवीन उपसरपंचाची निवड केली जाणार आहे. या निवडीच्या वेळी सदस्यांसोबत सरपंचांना एक मत देण्याचा अधिकार आहे. परंतु जर समान मते मिळाली तर आणखी एक निर्णायक मत देण्याचा अधिकार जनतेतून थेट निवड झालेल्या सरपंचांना आहे. यामुळे या निवडणुकीत सरपंचांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT