पुणे

शेवगाव : शेवगावच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेस तातडीने मंजुरी द्यावी - अरुण मुंढे यांची मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

CD

ARM26B03638
मुंबई : शेवगाव शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबत पाणुपरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे करताना शिवसेना नेते अरुण मुंढे, प्रेमसुख जाजू आदी.


‘पाणी योजनेच्या सुधारित प्रस्तावास मान्यता द्या’
शेवगाव, ता. ८ : शेवगाव शहरातील वाढती लोकसंख्या व भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्यता लक्षात घेता नागरिकांना नियमित, पुरेशा दाबाने व समन्यायी पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नगर पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी. तसेच योजनेतील टप्पा १ व टप्पा २ मधील प्रस्तावित कामांना तात्त्विक व प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते अरुण मुंढे यांनी मुंबई येथे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे केली.
शेवगाव शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, वाढती लोकसंख्या, उपलब्ध पाणीपुरवठ्यावरील वाढता ताण व आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता सुधारित पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे.
शहरातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळावे, यासाठी प्रस्तावित कामांना लवकरात लवकर मंजुरी मिळणे गरजेचे आहे. योजनेला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध झाल्यास रखडलेली तसेच प्रस्तावित कामे गतीने पूर्ण करता येतील. त्यामुळे आगामी पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याबरोबरच भविष्यातही शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम व शाश्वत करण्यास मदत होणार आहे. पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा १ व टप्पा २ मधील कामांना तात्त्विक व प्रशासकीय मान्यता देऊन त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना आपल्या स्तरावर निर्देश द्यावेत, अशी मागणी मुंढे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.
दरम्यान, मुंढे यांच्या मागणीची दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मकता दर्शवून याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुंढे यांना दिले. यावेळी प्रेमसुख जाजू उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

SCROLL FOR NEXT