Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation Sakal
पुणे

पुणे : स्थायी समितीचा अध्यक्ष ठरणार 'श्रीयाळशेठ'

ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

पुणे: पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची मुदत संपत आल्याने कायद्यानुसार रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी निवडणूक घ्यावी लागेल असा अभिप्राय विधी विभागाने नगरसचिव कार्यालयाला दिला आहे. नव्याने आठ सदस्य निवड झाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक घेण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार असल्याने स्थायीचा नवा अध्यक्ष म्हणजे औटघटकेचा राजा शिराळशेठ ठरणार आहे.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. त्यापैकी ८ सदस्यांची दोन वर्षाची मुदत १ मार्च रोजी संपणार आहे. तर, महापालिकेच्या सर्व नगरसेवकांची मुदत १४ मार्चला संपणार आहे. १ मार्च १४ जानेवारी या कालावधीत स्थायी समितीचे कामकाज करण्यासाठी नव्याने सदस्य नियुक्त करावेत की त्यास मुदतवाढ मिळू शकते याबाबत महापालिका प्रशासनाने राज्य सरकारसहीत महापालिकेच्या विधी विभागाकडे अभिप्राय मागविला होता. महापालिकेच्या विधी विभागाचा अभिप्राय नगरसचिव विभागाला मिळालेला असून, त्यामध्ये निवडणूक घेणे आवश्‍यक आहे, असे स्पष्ट केले आहे.

अशी असणार प्रक्रिया

स्थायी समितीच्या १६ पैकी ८ सदस्यांची मुदत १ मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर नवे आठ सदस्य निवड करण्यासाठी तीन दिवस आधी सूचना काढून खाससभा बोलवावी लागते. त्यामध्ये प्रत्येक पक्षाकडून सदस्यांची नावे देऊन त्यांची निवड केली जाईल. सदस्य निवडीनंतर अध्यक्षांची निवडणूकही घ्यावी लागेल. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांची वेळ घेणे आवश्‍यक असते. पीठासीन अधिकाऱ्याने वेळ दिल्यानंतर स्थायी अध्यक्षांची निवडणूक घेतली जाते.

त्यामुळे निवडणूक झालीच तर स्थायी समिती अध्यक्ष औटघटकेचे शिराळशेठ ठरणार आहेत.

या सदस्यांची संपणार मुदत

स्थायी समितीमधील भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवकाची मुदत संपणार आहे. यामध्ये भाजपच्या वर्षा तापकीर, सुनीता गलांडे, उज्वला जंगले, मानसी देशापांडे, राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर, अमृता बाबर, शिवसेनेचे बाळा ओसवाल आणि काँग्रेसच्या लता राजगुरू यांचा समावेश आहे. १ मार्च ते १४ मार्च या चौदा दिवसांसाठी याच सदस्यांना पुन्हा संधी मिळणार की नवे सदस्य येणार याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT