pune.jpg
pune.jpg 
पुणे

ब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात

संतोष आटोळे

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर, सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेला ब्रिटीशकालीन शिर्सुफळ तलाव सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. तलावाची जबाबदारी असणाऱ्या पाटबंधारे विभागाने याबाबत तलावाच्या क्षेत्राची मोजणी करुन तात्काळ अतिक्रमणे हटविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे बारामती तालुकाध्यक्ष अॅड राजकिरण शिंदे यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे केली आहे.

ब्रिटीश आमदानीत 1876-77 च्या दुष्काळामध्ये लोकांच्या हाताला काम द्यावे व भविष्यात पाण्याची चांगली सोय व्हावी म्हणून शिर्सुफळ तलावाचे काम हाती घेण्यात आले. रावणगाव व शिर्सुफळ या दोन्ही हद्दीतील सुमारे 834 एकर जमीन या तलावामध्ये गेली. तलावाची पाणी साठवण क्षमता 356.64 दशलक्ष घनफूट आहे. पूर्वी पावसाच्या पाण्यावर तलाव भरत आहे. पुढे 1980 च्या सुमारास खडकवासला धरणाचा नवीन मुठा उजवा कालवा आल्याने तलावात पाणी सोडण्याची सोय झाली. तसेच जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेपैकी शिरसाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित आहे. याचे पाणी दौंड व बारामती तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावांना शेतीसाठी सोडण्यात येते. असा हा ऐतिहासिक तलाव आता अतिक्रमणे, गाळ, काटेरी झाडे झुडपे या समस्यांनी ग्रासला आहे. याबाबत पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनारुप अतिक्रमणामुळे सध्या तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याचा पाणी साठवणुकीवर थेट परिणाम झाला आहे तर, जबाबदारी असणारे पाटबंधारे प्रशासन या बाबीकडे डोळेझाक करत आहे. 


- झाडेझुडपी हटली पण, दुरावस्था कायम
सन 1876-77 मध्ये लहानथोर मिळून एकूण 25 हजार 400 लोकांना या तलावाच्या कामावर रोजगार मिळाला. तलाव कामासाठी 1 लाख 58 हजार रुपये खर्च करण्यात आला. तलावाचे काम 1879 मध्ये पूर्ण होऊन त्याचवर्षी पाणी सिंचनासाठी देण्यास सुरुवात झाली. यावेळी पुणे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विल्यम क्लर्क होते. हा सर्व तपशील तलावाच्या भिंतीशेजारी असलेल्या कोनशिलेवर नमूद आहे. या कोणशीले भोवती झाडा झुडपांचा वेढा होता. याबाबत सकाळमध्ये सचित्र  
बातमी प्रसिध्द झाली होती. याची दखल घेत झाडे झुडपे हटविण्यात आली, मात्र जीर्ण झालेल्या कोनशिलेची दुरावस्था कायम आहे. यामुळे अशा या ऐतिहासिक तलावाच्या कोणशिलेचेही संर्वधन होणे आवश्यक आहे.अशी मागणी अॅड राजकिरण शिंदे यांनी दिली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT