Tushar Shelar and Bhagyashri Shelar sakal
पुणे

Police Recruitment : अर्धांगिनीसह साकारले खाकीच्या वर्दीचे स्वप्न! शेतातच मिळाली ‘गुड न्यूज’

चार वर्षे तो पोलिस भरतीसाठी पळत होता... प्रयत्न पुरेसे पडूनही नशीब साथ देत नव्हते... अखेर प्रयत्न चालू ठेवत शेतीतील कामात मन रमविले...

नितीन बारवकर

चार वर्षे तो पोलिस भरतीसाठी पळत होता... प्रयत्न पुरेसे पडूनही नशीब साथ देत नव्हते... अखेर प्रयत्न चालू ठेवत शेतीतील कामात मन रमविले...

शिरूर - चार वर्षे तो पोलिस भरतीसाठी पळत होता... प्रयत्न पुरेसे पडूनही नशीब साथ देत नव्हते... अखेर प्रयत्न चालू ठेवत शेतीतील कामात मन रमविले... दोन-अडीच वर्षांपासून मात्र पत्नीची केवळ साथच नाहीतर सक्रिय सहभाग मिळत गेला...पत्नीही त्याच्याबरोबर पळू लागली, व्यायाम करू लागली... कौटुंबिक सुखाचा त्याग केलेल्या या दांपत्याला केवळ पोलिस होण्याचेच वेध लागले... अर्धांगिनी असलेल्या भाग्यश्री हिच्या सर्वतोपरी सहकार्याने त्याचे भाग्य उजाळले... अन् पती-पत्नी दोघेही एकाचवेळी पोलिस झाले...!

पोलिस भरतीची चौथी व अंतिम मेरिट लिस्ट आज जाहीर झाली आणि तिकडे डोळे लावून बसलेल्या चांडोह (ता. शिरूर) येथील तुषार शेलार आणि भाग्यश्री शेलार या दांपत्याची नावे त्यात झळकल्यानंतर या कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. कुटुंबासमवेत हे दांपत्य आपल्या शेतात कांदा काढणीचे काम करीत होते. त्याचवेळी ही ‘गुड न्यूज’ त्यांना मिळाली आणि शेतकरी कुटुंबातील या दांपत्याने शेतातच आनंदोत्सव साजरा केला. लग्न झाल्यापासून केवळ पोलिस भरतीचाच ध्यास घेतलेल्या या दांपत्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही व आनंदाच्या भरात तुषार याने पत्नीला चक्क उचलून घेत जल्लोष केला.

तुषार व भाग्यश्री यांचा १७ जून २०२० रोजी विवाह झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील तुषार याला पोलिस व्हायचे होते. त्यासाठी विवाहापूर्वीपासून तो सराव करीत होता, कठोर मेहनत घेत होता. सातत्यपूर्ण व्यायामाबरोबरच अभ्यासावर लक्ष केंद्रित करूनही अपयश येत असल्याने तो काहीसा खचला होता. विवाह होऊन भाग्यश्री ही अर्धांगिनी म्हणून त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे भाग्यच उजळले. पतीची मानसिकता समजून घेत पत्नीने त्याला सर्वतोपरी खंबीर साथ दिली. इतकेच नव्हे तर स्वतःदेखील पोलिस होण्यासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरली. कौटुंबिक आनंदाचा काहीसा अव्हेर करीत या नवदांपत्याने व्यायाम, अभ्यास आणि कठोर मेहनतीने पोलिस भरतीचा सराव केला आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज यशाचे गोड फळ लागले.

माझी आई कुसुम शेलार हिने पाच वर्षे गावचे सरपंचपद सांभाळले. त्या कालावधीत तिने खूप चांगली कामे केली. ते पाहत असताना आपणही समाजासाठी काहीतरी करावे, हा ध्यास लागला. कौटुंबिक स्थिती बेताची, आर्थिक पाठबळ कमकुवत असल्याने अखेर पोलिस होऊन समाजसेवा करण्याचा ध्यास घेतला. पण अपयश पाठ सोडत नव्हते. अखेर पत्नी भाग्यश्री हिची सक्रिय साथ लाभली. वडील, मोठा भाऊ, वहिणींनी सर्वतोपरी सहकार्य केल्याने स्वप्न प्रत्यक्षात उतरले.

- तुषार शेलार

आई-वडिलांप्रमाणे जीव लावणारे सासू-सासरे, बहिणीची माया लावणारी जाऊ आणि भावाप्रमाणेच पाठीशी खंबीर उभे राहिलेले दीर, या सर्वांच्या पाठबळामुळे पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वस्व झोकून दिले. त्यातून मलाही पोलिस दलात जाण्याची प्रेरणा मिळाली. पतीच्या खांद्याला खांदा लावून व्यायाम, अभ्यास करताना सरावातून दोघांनाही हे यश मिळवता आले. पतीची जिद्द अन्‌ चिकाटी मलाही प्रेरणा देऊन गेली.

- भाग्यश्री शेलार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT