पुणे

‘माता कमला की रसोई’ला मिश्रा यांचा भेट

CD

शिरूर, ता. २७ : कधी जिलेबी, कधी बुंदी, कधी बालुशाही तर कधी आंबरस... त्यासोबत इतर पंचपक्वान्न आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी... एका वेळी तीन हजार जण बसून स्नेहभोजन करतील अशी हवेशीर सुसज्ज यंत्रणा... श्री महाशिवपुराण कथा श्रवणासाठी येथे आलेल्या हजारो शिवभक्तांची दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था असलेल्या ‘माता कमला की रसोई’मध्ये भक्तांचे केवळ पोटच भरत नाही तर मायेचा घास भरविल्याने मन देखील तृप्त होत आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेसाठी राज्याच्या विविध भागातून हजारो शिवभक्त येथे आले असून, कथासोहळ्याच्या मंडपातच मुक्कामी आहेत. कथेच्या सातही दिवस या बाहेरगावच्या भाविकांची या सोहळ्याचे आयोजक पी. आर. धारिवाल फाऊंडेशन मार्फत सकाळी चहा तसेच दुपारी व संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली आहे. भोजनासाठी स्वतंत्र मुदपाकखाना उभारला असून, एकावेळी तीन हजार जण बसून जेऊ शकतील असे प्रसादालयही उभारण्यात आले आहे. श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या मातोश्री दिवंगत कमलबाई रसिकलाल धारिवाल यांच्या नावे त्यासाठी ‘माता कमला की रसोई’ उभी केली आहे. फुलके किंवा चपाती, दोन भाज्या, वरण-भात व गोड घास येथे मायेने भरविला जातो. गेले तीन दिवस दररोज पाच ते सहा हजार भाविकांनी या प्रसादालयात भोजनाचा लाभ घेतला. आज भाविकांची संख्या वाढून दहा हजारावर गेली. मात्र अन्नदानाचा यज्ञ अखंडित चालूच होता.
कमला की रसोईला खुद्ध पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आज कथेनंतर भेट दिली. त्यांनी स्वतः भाविकांना जेवण वाढले. प्रकाश धारिवाल, दीना धारिवाल, आदित्य धारिवाल, साक्षी धारिवाल यांनीही स्वतः उभे राहून भाविकांना जेवण वाढण्याची सेवा बजावली. श्री जैन श्रावक संघाचे संघपती भरत चोरडिया, माजी नगरसेवक विजय दुगड व सचिन धाडीवाल, मयूर नहार, पवन गांधी, प्रमोद सागवेकर, शरद कालेवार, शंकरकाका परदेशी, सुशांत कुटे, जितेंद्र खांडरे, महिबूब सय्यद, अनिल बांडे, पंकज कोठारी, दीपक तंटक आदींसह शहरातील शेकडो कार्यकर्ते, महिला मंडळांच्या सदस्या, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी तरुण या सेवाकार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पुण्यातील राजस्थानी आचारी नारायण महाराज हे २५० सहकाऱ्यांच्या मदतीने अखंडपणे खपून शिवभक्तांसाठी भोजन तयार करीत आहेत.
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू असून, अनेक मुस्लिम बांधव या महिन्यात उपवास (रोजा) करतात. आज खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष मुश्ताक शेख, अल मदद बैतुल माल कमिटीचे अध्यक्ष फिरोज बागवान, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, माजी नगरसेवक आबीद शेख, राहिल शेख, असिफ शेख, हाफीज बागवान, कलिम सय्यद, तन्वीर शेख आदींनी श्री शिवमहापुराण कथासोहळ्याच्या प्रसादालयात येऊन शिवभक्तांना भोजन वाढण्याचे कार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT