KRK26B03793
करकंब : छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना छोटी शिवकन्या.
सामाजिक, शैक्षणिक संस्था, करकंब
........
करकंब : पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मैत्री साम्राज्य ग्रुपच्या सर्व रोगनिदान शिबिराचा ४६ जणांनी लाभ घेतला तर रक्तदान शिबिरात चाळीस जणांनी रक्तदान केले. मुस्लिम बांधवांच्या वतीने केळी व लाडू वाटप करण्यात आले. येथील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या ठिकाणी आमदार अभिजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, पंचायत समिती सदस्य राहुल पुरवत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोल शेळके, प्रदीप पाटील, आदींसह विविध संस्थांच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रतिमापूजन करून दर्शन घेतले. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, कृषी कार्यालय, सर्व शाळा व महाविद्यालये, करकंब स्थानक, कनकंबा चौक, संभाजीनगर, लोकरे वस्ती, धाकटी वेस, शुक्रवार पेठ, माळी गल्ली, देशमुख वस्ती आदी ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.