टाकळी हाजी, ता. २० : टाकळी हाजी (ता. शिरूर) व परिसरातील बेट भागात तरुणांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परंपरेनुसार युवकांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवज्योत प्रज्वलित केली. छत्रपतींच्या जन्मभूमीतून आणलेली शिवज्योत ढोल- ताशांच्या गजरात गावोगावी मिरवण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. काठापुर, पिंपरखेड, जांबुत, चांडोह, आमदाबाद, टाकळी हाजी, रावडेवाडी आदी गावांमध्ये भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक ठिकाणी लेझीम पथक, आकर्षक देखावे, तसेच महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. या उत्सवात ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. तरुणांनी छत्रपतींच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांचे स्मरण करून समाजएकतेचा संदेश दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.