जाफर अलिखान इराणी sakal
पुणे

महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणामध्ये फसवणुक करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिस अधिकारी व सीमाशुल्क विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून करीत होता फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिस अधिकारी व सीमाशुल्क विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा येथील अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एकाला इराणी नागरीकास शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध दिल्ली व हरियाणा येथे तब्बल 22 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका ट्रकचालकास पोलिस असल्याचे सांगून त्याची हजारो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

जाफर अलिखान इराणी (वय 30, रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील हिसार, दिल्ली येथील नागरीकांची फसवणूक करुन चोरी करणारा सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील साथीदार शिवाजीनगर येथील इराणी वस्तीमध्ये वेषांतर करुन वास्तव्य करीत असल्याची खबर शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, शिवाजीनगर पोलिसांचे पथक इराणी वस्तीमध्ये दाखल झाले. आरोपी लपून बसलेल्या घराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. तेव्हा, आरोपीचे कुटुंबीय व नातेवाईकांनी पोलिसांना विरोध दर्शवित आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर ते पळवून लावण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडले. पोलिसांनी त्यास शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पकडून आणल्यानंतर त्याची चौकशी केली.

तेव्हा, त्याने हरियाणातील हिसार येथे सीमाशुल्क विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून 45 लाख रुपये व एक किलो सोन्याची चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. लुधियाना येथे पोलिस असल्याची बतावणी करून 36 तोळे सोने त्याने चोरल्याचाही गुन्हा लुधियाना पोलिसांकडे दाखल आहे. याबरोबरच हरियाणा व दिल्लीत 22 गुन्हे केल्याचेही उघड झाले. नागरीकांची फसवणूक केल्याचा हरियाणामध्ये गुन्हा दाखल आहे. दरम्यान, त्याने नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एका ट्रक चालकास अडवून त्याच्याकडून जबरदस्तीने 27 हजार रुपये घेतले.श्रीगोंदा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. हि कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम माने, पोलिस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, विजय पानकर, विनोद महांगडे,पोलिस कर्मचारी बशीर सय्यद, अनिकेत भिंगारे, राहुल होळकर, अविनाश पुंडे, ज्ञानेश माने, अंकुश कोल्हे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Latest Marathi News Live Update : अशोक खरातला थोड्या वेळातच कोर्टात हजर करणार

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT