Shivneri Fort
Shivneri Fort Sakal
पुणे

Shivneri Fort : शिवनेरीवर ४० मजूरांच्या पथकाने नेला टेम्पो

दत्ता म्हसकर

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरील दगडी पदपथाच्या साहित्य वाहतुक करण्यासाठी पुरातत्व विभागाने बुधवार ता.२८ रोजी एक छोटा हत्ती टेम्पो गडावर नेला आहे.

जुन्नर - श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरील दगडी पदपथाच्या साहित्य वाहतुक करण्यासाठी पुरातत्व विभागाने बुधवार ता.२८ रोजी एक छोटा हत्ती टेम्पो गडावर नेला आहे.

शिवनेरीच्या पायथ्यापासून सुमारे तीन हजार ५०० फूट उंचीवर ७०० किलो वजनाचा हा टेम्पो नेताना या मार्गावर तीन टप्प्यात असणाऱ्या सुमारे ३५० दगडी पायऱ्यांवरून ओढून न्यावा लागला. हे काम चाळीस मजुरांनी तीन तासात पूर्ण केले. यामुळे येथील माल वाहतुकीचे काम गुरुवार ता. २९ पासून सुरू झाले असल्याचे पुरातत्व विभागाचे कर्मचारी गोकुळ दाभाडे यांनी सांगितले. गडावरील विविध कामाच्या अवजड मालवाहतुक करण्यासाठी गाढवे मिळत मिळत नाहीत. तसेच मजुरांची उपलब्धता होत नसल्याने यापूर्वी देखील किल्ल्यावर काम करण्यासाठी वनविभागाने एक टेम्पो नेला होता. तर पुरातत्व विभागाने एक छोटा ट्रॅक्टर देखील नेला होता.

अंबरखाना ते शिवजन्मस्थान या दगडी पद पथाच्या कामासाठी घडीव दगड, वाळू, खडी आदी साहित्याची वाहतूक करण्यासाठी छोटा टेम्पो किल्ल्यावर नेण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे पुरातत्व विभागाचे सर्वेक्षक सहाय्यक बाबासाहेब जंगले यांनी सांगितले.

पुरातत्व विभागाने हा जुना टेम्पो ९५ हजार रूपये किमतीस खरेदी केला. टेम्पो गडावर नेण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे ४० मजुरांना मजुरीचा खर्च ४० हजार आला. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो किल्ल्यावर चढविण्यास सुरवात करण्यात आली व दुपारी तीन वाजल्यानंतर तो गडावर पोचविण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT