Shivneri fort Sakal
पुणे

शिवनेरी शिवभक्तांसाठी खुले; पण शिवाई मंदिर राहणार बंदच

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी शिवभक्तांसाठी खुला करण्यात आला.

दत्ता म्हसकर

जुन्नर - पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाची स्मारके खुली करण्याचा आदेश दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आज शुक्रवार ता. १७ पासून छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी शिवभक्तांसाठी खुला करण्यात आला आहे. वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी यास दुजोरा दिला आहे. शिवभक्त व पर्यटकांना पवित्र शिवजन्मभूमीचे दर्शन घेता येणार आहे. आज पहिल्याच दिवशी पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील विविथ ठिकाणाहून दुचाकी व चारचाकी वाहनातून आलेल्या सुमारे पाचशे पर्यटकांनी शिवनेरीला भेट दिली असल्याचे वनपाल नितीन राऊत यांनी सांगितले.

जिल्ह्यातील स्मारके खुली करण्याचे निर्देश देण्यात यावेत असे भारतीय पुरातत्व विभागाच्या अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी पुरातत्व खात्यावर असून या ठिकाणी शारिरीक अंतर बाळगणे, मास्कचा तसेच सॅनिटायझर वापर बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शिवाई मंदिर बंद राहणार

शिवनेरी पर्यटक व शिवभक्तांसाठी खुला झाला असला तरी गडावरील शिवाई मातेचे मंदिर मात्र बंद राहणार असल्याचे पुजारी सोपान दुराफे यांनी सांगितले. मंदिरे खुली करण्याचा आदेश नसल्याने गडावरील शिवाई मातेचे दर्शन घेता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: SIR चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मागे घ्यावा, निवडणूक आयोगाने फसवणूक केली ; माजी न्यायमूर्तींचा खळबळजनक आरोप!

Pandharpur Vitthal Temple: विठुराया धावला शेतकऱ्यांच्या मदतीला! विठ्ठल मंदिर समितीची मुख्यमंत्री साहाय्यता निधीस दोन कोटींची मदत

Drought Crisis: दुष्काळ पाहणी दौऱ्यात मांडली होती व्यथा;राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येने भंडारा जिल्ह्यात हळहळ

Maharashtra Live News : सीजेपीच्या आंदोलनाआधीच पदाधिकारी ताब्यात

Karad, Koregaon Drought: शिवार वाळले, पिके करपली; कऱ्हाड, कोरेगावच्या शेतकऱ्यांचा दुष्काळी यादीत समावेशासाठी आक्रोश

SCROLL FOR NEXT