पुणे

वाढेगाव येथे गाडी आडवी का घालतो म्हणून मुलास मारहाण

CD

किरकोळ कारणावरून
काठी, विळ्याने मारहाण

सांगोला, ता. २५ : गाडी आडवी का घालतो म्हणून तिघांनी सोळा वर्षीय मुलाला विळा व काठीने मारहाण केल्याची घटना वाढेगाव (ता. सांगोला) २० फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध सांगोला ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
२० फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे आठ वाजता वाढेगाव येथे फिर्यादी सुरेश रामहरी पाटील (वय ४३, व्यवसाय-शेती, रा. वाढेगाव) यांचा मुलगा विश्वजित सुरेश पाटील (वय १६) याने गाडी आडवी का घातली, या कारणावरून वाद झाला. या वादातून मोहन ईश्वर दिघे याने विळ्याने विश्वजितच्या उजव्या बाजूच्या पोटावर वार करून जखमी केले. तसेच रामचंद्र गोविंद दिघे याने काठीने पाठीत मारहाण केली. त्यानंतर मोहन दिघे, रामचंद्र दिघे व रविंद्र मधुकर दिघे (सर्व रा. वाढेगाव) यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. जखमी विश्वजितला उपचारासाठी सांगोल्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दवाखान्यातील नोंदीनंतर या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT