पुणे

शेलारवाडीत महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची चोरी;

CD

आंधळगाव, ता. १६ : वडगाव रासाई (ता. शिरूर) हद्दीतील शेलारवाडी येथे महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी करून तसेच ऑइल सांडून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध मांडवगण फराटा पोलिस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत उमेश शिवाजी थोरवे (वय ३१, रा. वडगाव रासाई) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश थोरवे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वडगाव रासाई शाखेत वायरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात शेलारवाडी परिसरातील डीपी व ट्रान्सफॉर्मरची देखभाल येते. गुरुवारी (ता. १४) दुपारी शेलारवाडी येथील डीपीची किरकोळ दुरुस्ती करून थोरवे कार्यालयात परतले होते. त्यानंतर शनिवारी (ता. १६) सकाळी शेतकरी भानुदास शेलार व संजय शेलार यांनी फोन करून ‘मुग नंबर १’ हा ट्रान्सफॉर्मर पोलवरून खाली पडल्याची माहिती दिली.
घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता शेलारवाडी येथील १००/२२ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर खाली पडलेल्या अवस्थेत दिसून आला. ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल सांडलेले होते, तसेच त्यातील अंदाजे ८० किलो वजनाच्या तांब्याच्या कॉइल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर पोलवरून खाली पाडून त्याचे नुकसान करीत तांब्याच्या तारा चोरून नेल्याने महावितरण कंपनीचे सुमारे ४८ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT