पुणे

नाशिक संक्षिप्त बातम्या

CD

शॉर्टसर्किटमुळे मका चारा,
मका जळून खाक
चिचोंडी : येवला तालुक्यातील साताळी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शरद भिकाजी काळे या शेतकऱ्याचा एक एकर उन्हाळी मका चारा आणि मका जळून खाक झाला. वावटळीमुळे लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणग्या मक्याच्या शेतात पडल्या आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी पाण्याचे ड्रम, बादल्या आणि मोटार सुरू करून शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. वीज वितरण कंपनीला वारंवार सांगूनही लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती न केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप बाबासाहेब काळे व शेतमालकाने केला आहे.या आगीत शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून,प्रशासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दहिवाळ येथे कृषी
मार्गदर्शन मोहीम
मालेगाव शहर : मालेगाव कृषी विज्ञान केंद्रातर्फे दहिवाळ (ता. मालेगाव) येथे रासायनिक खतांचा संतुलित वापर जनजागृती मोहीमचे आयोजित करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (मृदशास्त्र) विजय शिंदे यांनी माती परीक्षण करण्याचे आवाहन केले. एकात्मिक अन्नद्रव्य, जमिनीची सुपीकता, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीसह जिवाणू खताचा वापर करावा. याविषयी माहिती देण्यात आली.

लोंबलेल्या तारा
काढण्याची मागणी
बिजोरसे : बिजोरसे (ता. बागलाण) शिवारात लोंबलेल्या तारा व वाकलेले खांब पावसापूर्वी काढण्याची मागणी शेतकरी अरुण खैरनार यांनी वीज महावितरण मंडळाकडे केली आहे. शिवारांत अनेक खांब वाकलेले असून तारा लोंबलेल्या आहेत. पावसाळा सुरू होईल व वादळी वाऱ्यासह ते खांब पडण्याची दाट शक्यता आहे. मागच्या महिन्यात अवकाळी पावसाने इजमाने टेंभे येथे खांब पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी चारा जळून गेला आहे.त्यामुळे त्वरित लोंबलेल्या तारा काढाव्यात. अन्यथा आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा शेतकरी अरुण खैरनार, दिनेश मोरे, रोहीदास काकडे, विलास मोरे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.

लखमापूरला मका
काढणी यंत्रास आग
लखमापूर, ता. बागलाण : येथील संजय गंगाधर भामरे यांच्या शेतातील घराशेजारी मका काढणी सुरू असताना अचानक आग लागल्याने त्यात ट्रॅक्टर, मका काढणी यंत्रासह मक्याचा चारा जळून नुकसान झाले. भामरे यांच्या शेतात मका काढणीचे यंत्र सुरू होते. यावेळी यंत्राला आग लागली. काम करणाऱ्या मजुरांनी तत्काळ मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, दुपारचे वाढलेले तापमान आणि मक्याचा सुका भुसा यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आगीत ट्रॅक्टरचे टायर, सीट, मका काढणी यंत्राचे टायर, मक्याचा चाराही खाक झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT