पुणे - लैंगिक शिक्षणाविषयी, संकल्पनेविषयी तरुणांचा संवाद वाढावा. लैंगिकतेविषयी जबाबदारीने सावधानता बाळगून योग्य मूल्यांकन करावे. त्या बाबतचे निर्णय स्वतः घेण्यासाठी प्रयास हेल्थ ग्रुपने पुढाकार घेतला आहे. त्यांच्यातर्फे या विषयाशी निगडित आठ शॉर्टफिल्म येत आहेत.
प्रयास हेल्थ क्लबच्या टक्नोपिअक किंवा सेफजर्नी या प्रोजेक्टअंतर्गत या संवादात्मक पद्धतीच्या शॉर्टफिल्म्सची निर्मिती होत आहे. तसेच, त्यामध्ये गर्भपात, वैद्यकीय काळजी, लहान मुलांचे लैंगिक शोषण, पॉर्नचे व्यसन, नैराश्य हे विषय प्रामुख्याने हाताळले जाणार आहेत. काही शॉर्टफिल्म्समध्ये तरुणांच्या दुर्लक्षित असलेल्या लैंगिक समस्यांवरही प्रकाश टाकण्यात येणार आहे. अलोक राजवाडे, वरूण नार्वेकर यांनी प्रत्येकी दोन शॉर्टफिल्म्सचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अनुपम बर्वे यांनी यांनी चार शॉर्टफिल्म्स दिग्दर्शित केल्या आहेत.
बर्वे म्हणाले,‘‘लैंगिकतेला नेहमी नैतिकतेच्या चष्म्यातून पाहिले जाते. त्याबाबत अनेक चुकीच्या संकल्पना आहेत. या शॉर्टफिल्म्सच्या निमित्ताने तरुणांबरोबर लैंगिकतेवर चर्चा होण्यासाठी मदत होईल.’’ प्रयास हेल्थ क्लबचे ज्येष्ठ संशोधक शिरीष दरक म्हणाले, ‘‘युनायटेड किंग्डम आधारित व्हीआयव्ही हेल्थ केअर संस्थेला प्रस्ताव पाठवला होता. त्याद्वारे मिळालेल्या निधीतून या शॉर्टफिल्म्सची निर्मिती करण्यात आली आहे. समाजामध्ये अजूनही लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलता येत नाही. अनेकांना बदनामीची भीती वाटते. ही दरी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.’’ यामध्ये अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले हे सादरकर्ते आहेत. पर्ण पेठे, सुव्रत जोशी असे अनेक कलाकार काम करणार आहेत. प्रयास हेल्थ ग्रुपच्या यूट्यूब चॅनेलवरील दर आठवड्याला एक शॉर्टफिल्म प्रदर्शित होणार आहे.
लैंगिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये या शॉर्टफिल्म दाखविण्यात येणार आहेत. तसेच त्याचा काही सकारात्मक परिणाम झाला, तर त्या मोठ्या गटापर्यंत पोचविल्या जाणार आहेत.
- शिरीष दरक, ज्येष्ठ संशोधक, प्रयास हेल्थ क्लब
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.