तारळेतील ‘श्री छत्रपती’
प्रकल्प प्रदर्शनात प्रथम
यांत्रिकी विभागात विद्यामंदिराची बाजी
तारळे, ता. १२ : पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य व फलटणच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतर्फे साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्ह्यातील ६४ विद्यालयांत कार्यरत विद्यार्थ्यांचे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल साक्षरता विषयातील प्रकल्पांचे प्रदर्शन झाले. त्यात येथील श्री छत्रपती विद्यामंदिराची उपकरणे होती. त्यात यांत्रिकी विभागात विद्यामंदिराने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य, तज्ज्ञ मार्गदर्शकांनी त्याचे परीक्षण केले. कार्यक्रमात विद्यालय, विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य जयंत साळुंखे, अटल लॅबचे प्रमुख सुनीता काशीद, पल्लवी सुर्वे, नारायण माळी आणि विद्यार्थी अंजली जाधव, श्रावणी जाधव, आर्या धाराशिवकर, वेदांत गिजरे व अनुराग लोहार हे या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, सर्व शालेय समित्यांचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्या स्वप्ना पाटील, पंचायत समिती सदस्य विकास जाधव, मधुकर पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, पालकांनी या यशाबद्दल अभिनंदन केले.
..............................
B01264
सातारा : पारितोषिक स्वीकारताना प्राचार्य जयंत साळुंखे, माळी, काशीद, सुर्वे, अंजली जाधव, श्रावणी जाधव.
.....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.