पुणे

सासुरे येथे श्री महांकाळेश्वररत्न पुरस्काराचे वितरण

CD

VRG26B06209
सासुरे (ता. बार्शी) ः येथे श्री महांकाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना श्री महांकाळेश्वररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित पुरस्कारर्थी व मान्यवर.

पुरस्कार ऊर्जादायी अन् आत्मविश्वास वाढविणारा
ॲड. रणवीर राऊत; सासुरेत श्री महांकाळेश्वर पुरस्कारांचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
वैराग, ता. २० ः प्रत्येक यशामागे अथक परिश्रम, ध्येयाप्रती निष्ठा आणि सकारात्मक दृष्टिकोन असतो, तेव्हाच यश मिळते. अशा यशवंतांना मिळालेला पुरस्कार हा केवळ सन्मानचिन्ह नसून, तो पुढील वाटचालीसाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास देणारा असतो, असे प्रतिपादन बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रणवीर राऊत यांनी केले.

तीर्थक्षेत्र सासुरे येथे श्री महांकाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या‍ मान्यवरांना ‘श्री महांकाळेश्वररत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी राऊत बोलत होते. अध्यक्षस्थानी विक्रीकर अधिकारी सूरज सुरवसे होते.
यावेळी वैराग नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शाहूराजे निंबाळकर, उद्योजक डॉ. अजयकुमार करंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका मनीषा ताकभाते, ह.भ.प. डॉ. रंगनाथ काकडे, पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, उमाकांत पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक महादेव आवारे यांनी केले. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने इच्छांत आवारे (पॅराकमांडो), सुमित ताटे (असिटंन्ट मॅनेंजर एसबीआय), साक्षी कोळी (पोस्ट अधिकारी), प्राची गोर्वधन (कृषी उपसंचालक) या यशवंतांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देण्यात आले.
अध्यक्ष विक्रीकर अधिकारी सुरवसे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना व नोकरी लागलेल्या युवकांच्या आयुष्यभर लक्षात राहणारा हा सन्मान असून, या सन्मानाचे महत्त्व आगळे आणि वेगळे असल्याचे सांगत या सोहळ्यातून अनेकांनी प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन भगवान ताकभाते यांनी केले. आभार माजी सरपंच तात्यासाहेब करंडे यांनी मानले.

यांचा झाला पुरस्काराने सन्मान
डॉ. गुलाबराव पाटील (देवदूत पुरस्कार), डॉ. मीरा सूर्यवंशी (श्री महांकाळेश्वर यशस्विनी गौरव), डॉ. सुहास आदमाने (श्री महांकाळेश्वर उद्योगरत्न), महेश मस्के (श्री महांकाळेश्ववर कलारत्न), राहूल भड (श्री महांकाळेश्वर समाजरत्न), सुप्रिया ताकभाते (श्री महांकाळेश्वर शिक्षकरत्न), गुलाब आवारे (श्री महांकाळेश्वर कृषीरत्न).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT